ETV Bharat / state

हिमंत असेल तर निवडणुका घ्या : 'त्यांचा' गद्दारीत स्ट्राईक रेट मोठा, संजय राऊत यांचा हल्लाबोल - Sanjay Raut News

Sanjay Raut News : उबाठा गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी गद्दारीत 'त्यांचा' स्ट्राईक रेट मोठा असल्याचंही स्पष्ट केलं.

Sanjay Raut News
खासदार संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2024, 2:30 PM IST

मुंबई Sanjay Raut News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच नेते दौरे करत असून, मतदारांना विविध आश्वासन दिली जात आहेत. रविवारी मराठवाडा दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करू असं आश्वासन दिलं. तर, दुसरीकडं महायुतीचे तीनही प्रमुख नेते लाडकी बहीण योजनेच्या प्रचारादरम्यान महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी साधलेल्या अनौपचारिक गप्पा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विधानसभा निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवली आहे. यावरुन आता उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि भाजपासह निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळला का ? : पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांच्या वक्तव्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला. यावेळी संजय राऊत यांनी, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळला आहे का ? न्यायालयाचा निकाल काय लागेल, हे देखील ते पहिलंच सांगत असतात. या देशात काहीही होऊ शकते. या देशात प्रधानमंत्री मुख्य न्यायाधीशांकडं जातात. त्यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतात. त्यामुळे आम्हाला देखील माहिती आहे, न्यायालयाचे निकाल का लागत नाहीत ते. निवडणूक आयोग सांगण्याआधी हे सांगत आहेत, निवडणुका कधी होणार ते, जसं की निवडणूक आयोग यांच्या खिशामध्ये आहे. देशातल्या सर्व संविधानिक संस्था या सरकारच्या खिशात आहेत. हेच लोकशाही समोरचं सर्वात मोठं संकट आहे."

एकनाथ शिंदेंचा स्टारईक रेट गद्दारीत आहे : महायुतीच्या जागावाटप हे मेरिटनुसार आणि स्ट्राइक रेट नुसारच होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "त्यांचा कसला स्ट्राईक रेट आहे? त्यांचा स्ट्राईक रेट म्हणजे गद्दारी, लुटमार, खोटं बोलणं, भ्रष्टाचार या बाबत मोठा आहे. त्यांचा कामाबाबत काहीच स्ट्राईक रेट नाही. पंतप्रधान मोदी झारखंड येथील लाडकी बहीण योजना बोगस आहे बोलत होते. तेच भाषण महाराष्ट्रात ऐकवा. हे डबल स्टँडर्डचे लोक आहेत. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना योग्य, मग झारखंडमध्ये योजना बोगस कशी?" असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा :

  1. गौतम अदानीकडून मोदींना पेन्शन मिळते, खासदार संजय राऊत यांची टीका - Old Pension Scheme
  2. पंतप्रधान मोदींना मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Pm Modi
  3. गृहमंत्री पदावरुन संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; नागपूर प्रकरणावरुन चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका - Sanjay Raut On Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.