सांगली Earthquake In Shirala Sangli: शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का बसला आहे. 3.0 रिश्टर स्केल भूकंपाचा हा सौम्य धक्का असल्याची नोंद झाली आहे. वारणावतीसह परिसरात पहाटे 4 वाजून 47 मिनिटांवर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. वारणवती पासून 8 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे समोर आले आहे.
गेल्या सात दिवसांपासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरण 85 टक्के इतके धरण भरलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे. मात्र, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही किंवा वित्तहानी झालेली नाही. त्याचबरोबर चांदोली धरणालादेखील कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे धरण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, अतिवृष्टी आणि आता भूकंपाच्या धक्क्यामुळे येथील नागरिक धास्तावले आहेत.
फेब्रुवारीमध्ये भूकंप: यापूर्वी शिराळा तालुक्यात फेब्रुवारीमध्ये सोम्य भूकंप जाणवला होता. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवतहानी झाली नव्हती. 2 फेब्रुवारी 2011 पासून 3 रिस्टर स्केल वरील झालेला हा 91 वा भूकंप आहे. काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जलना, परभणी या जिल्ह्यातं भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली येथे 21 मार्च 2024 रोजी 4.5 रिस्टर स्केल या तीव्रतेचा धक्का बसला होता.
आठवडाभरापासून पाऊस: आठवडाभऱ्यापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. पाऊसामुळे चांदोरी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे चांदोरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कोयणा धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभरात पाणीसाठ्यात दीड टीएमसीनं वाढ झाली. अतिवृष्ठीमुळे सातारा जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट होता. त्यात चांदोरी धरण परिसरात भूकंपाचा धक्का बसल्यानं नागरिक चिंतेत आहेत.
हेही वाचा