ETV Bharat / state

मिठाच्या पिशव्यातून ड्रग्जची तस्करी; सांगलीत 300 कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त - एमडी ड्रग

Drug Seized In Sangli : पुणे गुन्हे शाखेच्या पथकानं सांगली पोलिसांच्या मदतीनं टाकलेल्या छाप्यात कुपवाडमध्ये मिठाच्या पिशवीमध्ये लपवून ठेवलेले 300 कोटींचं 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.

Drug Seized In Sangli
300 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 10:27 AM IST

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड

सांगली Drug Seized In Sangli : पुण्यातले ड्रग्ज कनेक्शन थेट सांगलीपर्यंत असल्याचं उघडकीस आलंय. पुणे पोलिसांनी पुणे आणि दिल्लीनंतर थेट कुपवाडमध्ये छापा टाकत तब्बल 300 कोटींचा 140 किलो ड्रग्जसाठा जप्त केलाय. पुणे क्राईम ब्रँच आणि सांगली पोलिसांकडून ही संयुक्त माहिती देण्यात आलीय.

140 किलो एमडी ड्रग्ज जप्त : पुणे पोलिसांकडून तपासामध्ये ड्रग्जचं कनेक्शन थेट सांगलीपर्यंत असल्याचं समोर आल्यावर, पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून थेट सांगलीमध्ये धडक देण्यात आली. कुपवाड शहरामध्ये मोठा ड्रग्जसाठा आणण्यात आल्याची माहिती तपासामध्ये समोर आली होती. त्यानुसार पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून शहरामध्ये तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंत तीन ठिकाणी चौकशी सुरू होती. ज्यामध्ये बाळकृष्ण नगर येथील आयुब मकानदार यांच्या खोलीमध्ये तब्बल 140 किलो एमडी ड्रग्ज आढळून आलं. बाजारभावात या एमडी ड्रग्सची किंमत 280 ते 300 कोटींपर्यंत असल्याची माहिती, पुणे क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलीय.

तिघांना घेतलं ताब्यात : आयुब मकानदार हा बाळकृष्ण नगर इथं भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. त्याच ठिकाणी त्यानं पुण्यातून मिठाच्या पिशवीमध्ये आणलेला ड्रग्जचा साठा ठेवला होता. या प्रकरणी आयुब मकानदारसह दोघांना पुणे क्राईम ब्रँचकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं विनायक गायकवाड यांनी सांगितलं आहे.

सांगलीत छापे टाकून एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पथकानं सांगली पोलिसांच्या मदतीनं टाकलेल्या छाप्यात कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले 300 कोटींचं 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणी आयुब मकानदार याच्यासह दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. - विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (पुणे क्राईम ब्रँच)

याआधी अंमली पदार्थ तस्करी अटकेत : संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेला आयुब मकानदार 2015 मध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटकेत होता. जून 2023 मध्ये तो जामीनावर बाहेर आला होता. अटकेत असताना येरवडा तुरुंगामध्ये त्याचा अली नामक अंमली तस्कराशी संबंध आला होता. त्यातूनच त्याने हे पुण्यातून सांगलीमध्ये साठा करण्यासाठी ड्रस आणल्याचं सांगितलं.

मिठाच्या पिशवीत लपवले होते एमडी ड्रग्स : बुधवारी सकाळपासून कुपवाड शहरामध्ये पुणे क्राईम ब्रँच आणि सांगली पोलिसांकडून कुपवाड शहरातील बाळकृष्णनगर, स्वामी मळा आणि अन्य अश्या तीन ठिकाणी छापे टाकून चौकशी करण्यात आली होती. ज्यामध्ये आयुब मकानदार या व्यक्तीच्या भाड्याने राहत असलेल्या घरामधून मिठाच्या पिशवीत लपवून ठेवलेले एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. पुण्यातून हा एमडी ड्रग्ज कुपवाड या ठिकाणी एका टेम्पो मधून मिठाच्या पिशव्यांमधून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -

  1. कुरकुंभ एमआयडीसीमधील अमली पदार्थांच्या उत्पादनाचे दिल्लीपर्यंत धागेदोरे, कुणाचा आहे वरदहस्त?
  2. पुणे ड्रग्स प्रकरणाचं आढळलं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, कुरिअर कंपनीद्वारे 'या' शहरात जाणार होते अमली पदार्थ
  3. पुणे पोलिसांचा नादच खुळा; दिल्लीत कारवाई करत तब्बल 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.