ETV Bharat / state

दीड वर्षातच ‘समृद्धी’ला भगदाड; शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचारही उघड - नाना पटोले - Samruddhi Highway Nana Patole

Samriddhi Highway: नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगावजवळ नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील पुलावर मोठं भगदाड पडलंय. त्यामुळं पुलावरची वाहतूक थांबण्यात आली असून पुल बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

Samriddhi Highway
Samriddhi Highway
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 8:02 AM IST

Updated : Mar 3, 2024, 8:14 AM IST

अमरावती Samriddhi Highway : कोट्यवधी रुपये खर्चून अवघ्या दीड वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरजवळील पुलावर मोठं भगदाड पडल्यामुळं खळबळ उडाली आहे. त्यामुळं पुलावरू होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यावर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

"पुलाच्या भगदाडामुळं रस्त्याचा दर्जाच नाही, तर शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचारही उघड झाला आहे," डिझाइन, बांधकामातील त्रुटींबाबतच्या तक्रारींकडं दुर्लक्ष करण्यात आलं'. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

लेहगाव जवळ खळबळ : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लेहगाव जवळ समृद्धी महामार्गावरच्या पुलावर मोठा खड्डा पडल्याचं शनिवारी सकाळी ग्रामस्थांना आढळून आलं. याबाबत महामार्ग पोलिसांना माहिती मिळतात महामार्ग पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत पुलावर बॅरिकेट्स लावले आहेत. तसंच या मार्गावरून वाहतूक बंद केली.

कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हजारो कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला. हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम वर्ष पूर्ण झालं आहे. ताशी 120 किमी वेगानं जाणारे वाहन अशा भगदाडावरून गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं नागरिकांच्या जीवाशी हा खेळ असल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसंच पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. "मुंबईहून नागपूरला 12 तासांत जाण्याचा दावा करणाऱ्या महामार्गाची अवस्था दयनीय आहे. जीवघेण्या अपघातांच्या संख्येमुळं समृद्धी महामार्ग स्थापनेपासूनच वादग्रस्त ठरला आहे. त्यानंतर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पुलाला मोठा खड्डा पडला आहे, असंदेखील नाना पटोले यांनी म्हटलंय.

मोठ्या अपघाताची शक्यता : नागपूरवरून मुंबईपर्यंत केवळ सात तासात समृद्धी महामार्गावरून पोहोचू शकतो, असा दावा सरकारकडून करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 700 किमी लांबीच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं होतं.

हे वाचलंत का :

  1. भाजपाच्या पहिल्या यादीत राज्यातील एकाच नेत्यावर 'कृपा', उत्तर प्रदेशातून दिलं लोकसभेचं तिकीट
  2. नाव, चिन्हानंतर शिवसेनेच्या खात्यातील पैशांवरून वाद वाढला, शिंदे गटाच्या तक्रारीनंतर अनिल देसाईंना मुंबई पोलिसांची नोटीस
  3. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला स्थान नाही

Last Updated : Mar 3, 2024, 8:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.