ETV Bharat / state

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्यानं तीन जणांचा मृत्यू - Samruddhi Highway

Samruddhi Highway Accident : आज (25 जानेवारी) पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडी चालवत असताना चालकाला 'डुलकी' लागल्याने बाजूच्या कंटेनरला गाडीची धडक लागल्यानं हा अपघात घडला आहे.

samruddhi highway travels accident due to the driver falling asleep three died
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्यानं तीन जणांचा मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 12:16 PM IST

अमरावती Samruddhi Highway Accident : अमरावती शहरालगत समृद्धी महामार्गावर गुरुवारी (25 जानेवारी) पहाटे पाच वाजेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही बस नगरवरुन रायपूरला जात असताना वाढोणा शिवणी या गावाजवळ हा अपघात झाला आहे.

चालकाला डुलकी लागली अन्.. : नगर इथून बुधवारी (24 जानेवारी) रात्री निघालेली खासगी बस रायपूरकडं जात असताना अमरावती जिल्ह्यातील वाढोणा शिवणी गावालगत भरधाव असणाऱ्या बस चालकाला अचानक डुलकी लागली. त्यावेळी ही भरधाव वेगात असणारी बस बाजुनं जाणाऱ्या कंटेनरवर धडकली आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचा ताफा अपघात स्थळी धावून आला. यावेळी रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचल्या. अपघातातील जखमींना पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे अमरावतीत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं आहे. या अपघातात तिघेजण ठार झाले असून त्यांची ओळख अद्याप पटायची आहे. दरम्यान, या संदर्भातील अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.

समृद्धी महामार्ग आणि अपघात : समृद्धी महामार्गावर आतापर्यंत जवळपास एक हजारांच्यावर अपघात घडले असून यामध्ये 368 जणांनी आपला जीव गमावलाय. अनेकदा चालकाला झोप येणं किंवा डुलकी लागणं या कारणामुळे 183 अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तसंच टायर फुटल्यामुळं 51 अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तर तांत्रिक कारणांमुळे आतापर्यंत जवळपास 200 अपघात झाले आहेत.

हेही वाचा -

  1. Samruddhi Mahamarg Accident : अपघातात नात अन् सुनेचा मृत्यू; सासूचा मन सुन्न करणारा आक्रोश, गावावर शोककळा
  2. Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर १२ जणांचा मृत्यू, पंतप्रधान कार्यालयाकडून मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर
  3. Samruddhi Expressway : महामार्गाचं काम करणारा कंपनी मालक झाला 'समृद्ध'; ठेकेदाराला लाखोंचा चुना लावून फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.