ETV Bharat / state

मविआने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू; अखिलेश यादव यांचा इशारा - Akhilesh Yadav Warns MVA

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 9:43 PM IST

Akhilesh Yadav Warns MVA : समाजवादी पक्षानं महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे; परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व न मिळाल्यास महाराष्ट्रात आपण स्वबळावर लढू असा इशारा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिला आहे. जाणून घ्या त्यांचं मत

Akhilesh Yadav Warns MVA
अखिलेश यादव (ETV Bharat Reporter)

मुंबई Akhilesh Yadav Warns MVA : समाजवादी पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत आहे. आगामी विधानसभा निवडणूक देखील आम्हाला महाविकास आघाडी सोबत लढवण्याची इच्छा आहे; मात्र जागावाटपात पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्यास किंवा आमच्याकडे मविआने दुर्लक्ष केल्यास आम्ही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवू, असा इशारा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाला उपस्थिती लावण्यासाठी नेते अखिलेश यादव मुंबईत आले आहेत. वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी, आमदार रईस शेख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बुथ स्तरावर तयारी करण्याच्या सूचना : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि मुंबई महापालिकेची निवडणूक या दोन्ही निवडणुकांसाठी तयारीला लागण्याची सूचना त्यांनी केली. पक्षाने जर महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवली किंवा स्वबळावर निवडणूक लढवली तरीही कार्यकर्त्यांनी दोन्ही परिस्थितीत सज्ज राहणं गरजेचं आहे. बुथ स्तरापर्यंतची तयारी पूर्ण करावी. जेणेकरून निवडणुकीत त्याचा लाभ मिळेल, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी मार्गदर्शन केले.

महाविकास आघाडी गांभीर्यानं घेणार का? : यापूर्वी अबू आसिम आझमी यांनी देखील महाविकास आघाडीला इशारा देत आघाडीत सन्मान न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा दिला होता. आता खुद्द पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच हा इशारा दिल्यानं महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा या पक्षांचे नेतृत्व किती गंभीरपणे या इशाऱ्याकडे लक्ष देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षानं 85 उमेदवार उभे केले होते; त्यापैकी 6 जण विजयी होऊन नगरसेवक झाले होते.

समाजवादी पक्षाच्या सर्व खासदारांचा होणार मुंबईत सन्मान : समाजवादी पक्षाचे 37 उमेदवार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामध्ये पक्षाध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा समावेश आहे. या सर्व नवनिर्वाचित 37 खासदारांना दक्षिण मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे एका विशेष कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून मुंबईतील आपल्या व्होटबँकेला अधिक सक्षम करण्यासाठी समाजवादी पक्षाने या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची चर्चा आहे. आपल्या सर्व 37 खासदारांचा एकाच ठिकाणी सन्मान करून शक्तिप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

  1. खोटे नरेटिव्ह सेट करणारे देशाच्या विकासाचे शत्रु; देशाच्या आर्थिक राजधानीतून पंतप्रधानांची विरोधकांवर टीका - PM Modi in Mumbai
  2. "बेसावध राहिलो, पण..."; विधानपरिषद निवडणुकीत पराभवानंतर जयंत पाटीलांनी व्यक्त केली खंत - MLC Election Results 2024
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; विविध विकासकामांचं करणार लोकार्पण - PM Modi In Mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.