ETV Bharat / state

शीळ मंदिर अत्याचार-हत्या प्रकरण; अशा नराधमांच्या फाशीसाठी पाठपुरावा करणार, रूपाली चाकणकरांचं आश्वासन - Rupali Chakankar on Rape Case - RUPALI CHAKANKAR ON RAPE CASE

Rupali Chakankar on Rape Case : नवी मुंबईतील शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता यांची राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे

Rupali Chakankar on Rape Case
रूपाली चाकणकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 3:58 PM IST

मुंबई Rupali Chakankar on Rape Case : नवी मुंबई येथील शीळ परिसरातील एका मंदिरात महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या (Woman Rape And Murder) करणाऱ्या नराधमांना फाशी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्यात यावा यासाठीही आपण प्रयत्न करू असं त्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबाची नवी मुंबईत भेट घेतल्यानंतर सांगितलं.

प्रतिक्रिया देताना रूपाली चाकणकर (ETV BHARAT Reporter)

मंदिरात महिलेवर अमानुष अत्याचार : नवी मुंबईतील शीळ परिसरात काही दिवसांपूर्वी मंदिरात आश्रयाला गेलेल्या एका महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची भीषण घटना घडली होती. राज्य महिला आयोगाच्या वतीनं या घटनेची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश आणि आयोगाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या आरोपीची अटक आणि तपासाबाबत आपण सातत्यानं माहिती घेत होतो, असं चाकणकर यांनी सांगितलं.

चाकणकरांची पिडीतेच्या कुटुंबीयांना भेट : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज पीडित महिलेच्या कुटुंबीयांची नवी मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली. तिच्या आई-वडील आणि बहीण यांच्याकडून तिच्या सासरच्या त्रासाबाबत माहिती घेतली. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन करत या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती कुटुंबीयांनाही देण्यात यावी आणि त्यांच्या शंकाही सोडवाव्यात, असे चाकणकर यांनी पोलिसांना सांगितलं.

नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी : हा खटला आता द्रुतगती न्यायालयात चालवण्यात यावा यासाठी आपण पाठपुरावा करणार असून सदर महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करू. या महिलेवर सासरच्या व्यक्तींकडून होणाऱ्या छळाची ही चौकशी होऊन त्यांच्यावरही कार्यवाही व्हावी तसेच सदर महिलेच्या लहान मुलाला शासकीय मदत मिळावी यासाठीही आपण प्रशासनाशी प्रयत्न करणार असल्याचं चाकणकर यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. खासगी शिकवणी वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, शिक्षेकेच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल होताच आरोपी फरार - Sexual Assault On Minor Student
  2. नववीत शिकणाऱ्या मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार, पीडितेच्या कुटुंबीयांना आरोपीकडून धमक्या - Minor Girl Rape Case Beed
  3. चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून, शेजारी राहणाऱ्या नराधमाला अटक - Bhiwandi Rape News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.