ETV Bharat / state

2024 नंतर भाजपा सत्तेत आल्यावर कुठलंही आरक्षण राहणार नाही- रोहित पवार

Rohit Pawar On Reservation Issue: आरक्षणाच्या बाबतीत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात मोठं व्यक्तव्य केलं आहे. आरक्षणाच्या बाबतीत भाजपा कधीही ठोस निर्णय घेत नाही. ते नेहमी दिशाभूल करतात, असं ते म्हणाले.

Rohit Pawar On Reservation Issue
रोहित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 8:54 PM IST

आरक्षणाच्या मुद्द्‌यावर बोलताना आमदार रोहित पवार

पुणे Rohit Pawar On Reservation Issue : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. त्यांची आज (14 फेब्रुवारी) तब्येत खालावली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''आंदोलनाच्या बाबतीत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत भाजपा कधीही ठोस निर्णय घेत नाही. ते नेहमी दिशाभूल करत असतात. मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपाचे काही नेते सदावर्ते यांना पुढे करून विरोध करतात. 2024 नंतर भाजपा सत्तेत आल्यावर कुठलंही आरक्षण राहणार नाही.''

बैठकीत 'या' विषयावर चर्चा: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांची ही पहिलीच बैठक असून या बैठकीला पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा तसेच पक्ष आणि चिन्ह यावर चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे, अशोक पवार, आमदार शशिकांत शिंदे, अनिल देशमुख उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

ही चर्चा चॅनलवर आल्यावरच कळली : यावेळी शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, अशी चर्चा आहे. यावर रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, ही चर्चा चॅनलवर आल्यावरच आम्हाला कळाली. अशी कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झालेली नाही. आजची बैठक ही महाविकास आघाडीच्या संदर्भात झालेली आहे. पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या बाबतीत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, ''आजच सुप्रीम कोर्टात पक्षाला जे नवीन नाव मिळालं आहे. ते किती दिवस वापरायचं याबाबत सुनावणी आहे. तसेच चिन्हाच्या बाबतीत पुढील काळात ठरणार आहे.

यावरून भाजपाचा अहंकार दिसून येतो: लोकसभेच्या जागेबाबत आमदार रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, चांगली बाब म्हणजे 48 जागांपैकी 40 जागांवर एकमत झालेलं आहे. उरलेल्या 8 जागेवर चर्चा सुरू आहे. लवकरच या जागेचादेखील प्रश्न हा सुटणार आहे. शेतकरी आंदोलनाबाबत रोहित पवार म्हणाले की, याच्यावरून भाजपाचा अहंकार दिसून येतो. शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.

हेही वाचा:

  1. हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील कलाकार उत्साहात साजरा करत आहेत 'व्हॅलेंटाईन्स डे'
  2. राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, 'आयारामांचं' नशिब फळफळलं; अजित पवार गटाचे मात्र 'वेट अ‍ॅंड वॉच'
  3. राज्यसभा सदस्यांची निवड प्रक्रिया, राज्यसभा निवडणूक आणि राजकारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.