ETV Bharat / state

अजित पवार गट म्हणजे ४२० गँग! रोहित पवारांचा 'घड्याळ तेच वेळ नवी' वरुन टोला - Rohit Pawar

Rohit Pawar आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्यावर थेट टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटानं पक्षाचं वाक्य घड्याळ तेच वेळ नवी असा उल्लेख केला आहे. याबाबत रोहित पवार यांनी घड्याळ चिन्हावरच्या बदललेल्या वेळेवरून अजित पवार गटातील नेत्यांचा ४२० गँग असा उल्लेख केलाय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 1:41 PM IST

Updated : Mar 29, 2024, 3:26 PM IST

रोहित पवारांचा 'घड्याळ तेच वेळ नवी' वरुन टोला

पुणे Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्यावर थेट टीका करत असल्याचं पाहायला मिळतय. काल देखील रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं पक्षाचं वाक्य घड्याळ तेच वेळ नवी असं केलं आहे. याबाबत रोहित पवार यांनी घड्याळ चिन्हावरच्या बदललेल्या वेळेवरून अजित पवार गटातील नेत्यांचा ४२० गँग असा उल्लेख केलाय. रोहित पवार यांची अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान संवाद मेळाव्यात रोहित पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले की पूर्वी घड्याळात १० वाजून १० मिनिट टाइम असायचा आत्ता तो बदलून ४ वाजून २० मिनिट झाला आहे. तटकरे साहेब बोलतात घड्याळ तेच पण वेळ नवी आत्ता जी वेळ आहे ती ४ वाजून २० मिनिटांची आहे याचा अर्थ काय आहे हे फ्रॉडचं कलम आहे. घड्याळ आणि चिन्ह चोरून भाजपा सोबत गेलेली ही फ्रॉड ४२० गँग फार काळ सत्तेत राहणार नाही,असं म्हणतं रोहित पवार यांनी केली टीका केली आहे.

पवार पुढे म्हणाले की कमळाबाई बद्दल पूर्वी अजित पवार लय भारी भारी बोलायचे, तेव्हा लय भारी वाटायचं. पण मला हे कळत नाही एवढ्या लगेच लोक आपली भूमिका कसं काय बदलतात? पूर्वी वेगळं बोलायचे आणि आता वेगळं बोलतात. त्यामुळे पूर्वी राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ म्हणतं व्हिडिओ लावायचे, तसं मोठं मोठ्या सभेत व्हिडिओ लावण्याची वेळ येणार आहे. ह्यांची भूमिका फिक्स नाही, आधी म्हणायचे पवार साहेब मोठे नेते आणि आता म्हणतायेत मोदी मोठे नेते. पूर्वी तुम्ही मोदींच्या विरोधात बोलला आणि आता ज्यांनी तुम्हाला उभं केलं त्या पवार साहेबांच्या विरोधात बोलत आहात. काय गल्लत झालीय कळेना असं यावेळी रोहित पवार म्हणाले.

आम्ही सत्ता बघितली विरोध बघितला, आम्ही कुटुंब फुटताना बघितलं, आम्ही पार्टी फुटताना बघितली, कोरोनासारखा काळ बघितला. आता अजून 7-8 महिने राहिलेत. अजून काय-काय बघायचं राहिलय, काय माहिती. विधानसभेला आपले सर्वात जास्त आमदार निवडून येतीलच. पण 2024 ला महाराष्ट्रात याठिकाणची स्वाभिमानी जनता भाजपाला बाहेर ठेऊन महाविकास आघाडीची सत्ता आणेल, असं यावेळी रोहित पवार म्हणाले.

हे वाचलंत का..

  1. शासकीय आश्रम शाळेत कोट्यवधीचा दूध घोटाळा? ८० कोटीची दलाली घेतल्याचा रोहित पवारांचा सरकारवर थेट आरोप - Rohit Pawar Allegations
  2. "मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही"; आमदार रोहित पवारांचा स्पष्ट निर्धार
  3. मला अटक होण्याची शक्यता; पण मी लढत राहणार, आमदार रोहित पवारांचा निर्धार

Last Updated : Mar 29, 2024, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.