बारामती(पुणे) Ajit Pawar Mimicry Rohit Pawar : राज्यात तिसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळवार, 7 मे रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळं निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. आज झालेल्या सभेत अजित पवार विरुद्ध शरद पवार गटाचा सामना दिसून आला आहे. एवढंच नाही तर सभेत रोहित पवार भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यावर त्यांना चिमटा काढत टोमना मारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत प्रचाराची सांगता करताना आमदार रोहित पवार, सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं. शरद पवार यांच्या सांगता सभेमध्ये रोहित पवार यांचं भाषण झालं होतं. या भाषणादरम्यान रोहित पवार भावनिक झाल्याचं दिसून आलं.
रोहित पवारांची उडवली खिल्ली : आज झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. मी सांगितल्याप्रमाणं शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या एका पठ्ठ्यानं तर डोळ्यातून पाणी काढलं. मी पण पाणी काढून दाखवतो. मला मतदान द्या. असली नौटंकी बारामतीकर अजिबात खपवून घेणार नाहीत. हा रडीचा डाव झाला. तुम्ही कामाच्या जोरावार मते मागा, आपलं खणखणीत नाणे दाखवा, असं म्हणत अजित पवारांनी आमदार रोहित पवारांचा समाचार घेतला.
सुप्रिया सुळेंवर टीका : यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली. सुप्रिया सुळे यांनी माझा नवरा माझा पर्स सांभाळत नाही, अशा स्वरूपाची टिका काही दिवसांपूर्वी केली होती. त्याला अजित पवारांनी जोरदार उत्तर दिलं. ते म्हणाले महिला लोकसभेत गेल्यानंतर त्यांचा नवरा पर्स घेऊन जातो का? मला तर एकेकाला अशी उत्तर देता येईल की, पळता भुई थोडी होईल. मी म्हणतो आपलीच भावंडे आहेत, जाऊ द्या, बहीण आहे जाऊ द्या, पण हे जरा जास्तच व्हायला लागलंय. हे चालणार नाही, असा इशारा त्यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.
हे वाचलंत का :
- हेमंत करकरेंना 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातल्या गोळ्या, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ - Vijay Wadettiwar
- EXCLUSIVE : या निवडणुकीत जनतेचा मूड काय? पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' उत्तर - PM Modi Interview with Eenadu
- हेमंत करकरेंना 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातल्या गोळ्या, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ - Vijay Wadettiwar