ETV Bharat / state

राज्यातील राजकीय संस्कृती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच घसरली; रोहित पवारांची टीका - Rohit Pawar PC

Rohit Pawar PC : पुण्यात आज (7 एप्रिल) आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरले. "त्यांचा सत्तेचा अहंकार लोक या निवडणुकीत पायाखाली तुडवतील," असं रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar PC
रोहित पवारांची टीका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 6:13 PM IST

रोहित पवार देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना

पुणे Rohit Pawar PC : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, "आज राज्याची जी राजकीय परिस्थिती झाली आहे, त्याचा कर्ताधर्ता कोण असेल ते देवेंद्र फडणवीस आहेत. 2014 नंतर राज्याची राजकीय संस्कृती ही कोणामुळे खाली आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली आहे. पक्ष आणि कुटुंब फोडणं हे फडणवीसांचं काम आहे. त्यांनी स्वतः सांगितलं आहे की, मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो आहे. हा पुन्हा आलेला अहंकार लोकच या निवडणुकीत पायाखाली तुडवतील."

सुप्रिया सुळे 3 लाख मतांनी निवडून येतील : प्रवीण माने यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "प्रवीण माने यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यांची खूप मोठी संपत्ती आहे. त्यामुळे माने मनातून गेले की, त्यांना मारुन नेलं हे बघावं लागेल. आज नेते गेले मात्र लोक आपल्या सोबत असून सुप्रिया सुळे 3 लाख मताच्या लीडनं निवडून येतील," असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

खडसेंना भाजपा जेलमध्ये टाकू शकते : एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मी त्यांच्या बद्दल बोलणार नाही. त्यांच्या अडचणी खूप आहेत. भाजपा खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकते. खडसेंची तब्येत खूप खराब आहे. अशा तब्येतीत त्यांना भाजपा जेलमध्ये देखील टाकू शकते. भाजपानं असे खोटे आरोप करुन अनेक नेत्यांची ताकद कमी केली. नेत्यांना भीती दाखवली जात आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवाल यांना आत टाकलं तसं त्यांचा प्लॅन असेल. म्हणून ते पक्ष प्रवेश करत असावे."

फडणवीसांचं राजकीय वजन कमी झालं : राज्यात आता पुन्हा विनोद तावडे यांची ताकद वाढत आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे आता वैतागले आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून देखील विनोद तावडे यांच्याकडं महाराष्ट्र राज्याचे सगळे अधिकार जात आहेत. राज्यातले सगळे मोठे निर्णय ते घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन कमी होत असल्यामुळे अशी विधानं करत आहेत. फडणवीस आणि त्यांच्या कडील नेते घाबरले आहेत."

खेकडा दाखवला म्हणून पेटा संघटनेची नोटीस : खेकडा दाखवला म्हणून पेटा संघटनेने नोटीस पाठवली आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "अजून नोटीस आली नाही. योग्य वेळी उत्तर देऊ. मी हॉटेलमधून तो खेकडा आणला. जर मी नसता आणला तर कुणी तरी खाल्ला असता. नंतर आम्ही त्याला नदीत टाकला. आम्ही शोधत आहोत, त्या खेकड्याला. सापडला की त्याची त्याला प्रेस घ्यायला लावू. पण दुसरीकडे जे लोक महाराष्ट्राच्या तिजोरीला पोखरत आहेत त्यांचं काय? लवकरच तिसरी फाईल उघडू. मोठे घोटाळे आहेत ते समोर आणू," असं यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा :

  1. पक्षाच्या नावासह चिन्ह गमाविले! लोकसभा निवडणुकीत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंचा राजकीय अस्तित्वाकरिता संघर्ष - Maharashtra politics
  2. भिवंडीत महायुतीत फूट? शिवसेनेचं खच्चीकरण करणारे भाजपाचे उमेदवार नको! - Bhiwandi Lok Sabha Constituency
  3. एकनाथ खडसे करणार 'घरवापसी', खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत काय म्हणाले सत्ताधारी-विरोधक? - Eknath Khadse

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.