ETV Bharat / state

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांचं पंतप्रधानांना आव्हान, म्हणाले," हिम्मत असेल तर संसद भवनातून..." - REVANTH REDDY NEWS

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसनं दिलेल्या गॅरंटीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलं आहे. ते काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

revanth reddy challenges BJP Modi
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2024, 2:05 PM IST

पुणे- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचात देशातील अनेक नेते मंडळी प्रचारात आले आहेत. काँग्रेसनं इतर राज्यात दिलेल्या गॅरंटी पूर्ण केली नसल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत टीका केली होती. यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसच्या गॅरंटीवरून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना थेट आव्हान दिले. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले, "खरंच तुमच्यात हिम्मत असेल तर एक कमिटी बनवा आणि तेलंगणाला पाठवा. जर यायला पैसे नसेल तर हेलिकॉप्टर पाठवतो. आम्ही दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या की नाही ते बघा."

गॅरंटी काँग्रेस पक्षाच्या आहेत-ते पुढे म्हणाले, " आम्ही तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. 25 दिवसात 18 हजार कोटी रुपये देऊन 23 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. तसेच या दहा महिन्यात 50 हजार सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. तसेच महिलांना मोफत बस सेवादेखील देण्यात आली. आम्ही गरीब लोकांना 500 रुपयात सिलेंडर आणि सर्वसामान्य लोकांना मोफत 200 युनिट वीज दिली आहे. घोषणांप्रमाणं काँग्रेसनं गॅरंटी पूर्ण केल्या आहेत. या गॅरंटी काँग्रेस पक्षाच्या आहेत. मोदी सरकारच्या गॅरंटी नाहीत. निवडणुकीला दोन दिवस शिल्लक असताना जर कोणाला येऊन बघायचे असेल त्यांनी बघावे. जर या गॅरंटीत चुकीचे असेल तर आम्ही माफी मागू," असे यावेळी रेड्डी म्हणाले.

मोदींचे गुलाम झाले-राज्य सरकारबाबत रेड्डी म्हणाले, " महाराष्ट्र हा गद्दारांचा अड्डा बनवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुलाम बनले आहेत. तसेच अजित पवार यांनीदेखील शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते मोदीजी यांचे गुलाम झाले आहेत. तशाच पद्धतीनं अशोक चव्हाण यांना काँग्रेसने काही नाही दिलं एवढं सगळं काँग्रेसनं दिलेलं असतानादेखील अशोक चव्हाण यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून तेदेखील मोदींचे गुलाम झाले आहेत. हे सगळे राज्यातील जनतेला धोका देत गुजरातचे गुलाम झाले आहेत."

अकरा वर्षात काय केलं?यावेळी रेवंत रेड्डी म्हणाले," महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू असताना भाजप मैदान सोडून पळत आहे. पंतप्रधान विदेशात फिरत आहेत. आज आपण महाराष्ट्राच्या या निवडणुकीतील मुद्दे बघितलं तर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा देश तोडत आहेत. त्यांनी अकरा वर्षात काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगण्यापेक्षा नवनवीन मुद्दे चर्चेत आणले जातं आहे.माझं भाजपाला एक प्रश्न आहे. त्यांनी 2014 च्या निवडणुकीत अनेक वचन दिले होते. त्यांचं काय झालं? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. तसेच भाजपासाठी आधी अदानी आणि अंबानी होते. आता मात्र, आता एक है तो सेफ आहे म्हणून मुंबई अदानी यांच्या घशात घातली जात आहे," अशी जोरदार टीका यावेळी रेड्डी यांनी केली.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.