ETV Bharat / state

अमृतसर येथील भव्य सुवर्ण मंदिर पुण्यात! परंतु प्रतिकृतीला शीख समुदायाचा विरोध - Golden Temple Replica - GOLDEN TEMPLE REPLICA

Replica of Golden Temple : सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीनं यंदा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. मात्र, या प्रतिकृतीला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून (SGPC) विरोध केला जात असल्याचं बघायला मिळतंय.

Replica of Golden Temple of Amritsar in Pune, but SGPC committee opposes the replica
सुवर्ण मंदिर प्रतिकृती पुणे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 5:16 PM IST

Updated : Sep 5, 2024, 5:37 PM IST

पुणे Replica of Golden Temple : गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विविध देखावे साकारले जातात. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाकडून यंदा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. मात्र, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं (SGPC) याला विरोध केलाय. अमृतसर येथील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (SGPC) अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी एक्सवर पोस्ट करत हे शीखांच्या भावना भडकवणारं कृत्य असल्याचं म्हटलय.

छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)
मंडळाचं स्पष्टीकरण : यासंदर्भात छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांना विचारलं असता ते म्हणाले, "त्यांनी छत्रपती राजाराम मंडळाला कोणताही विरोध केलेला नाही. त्यांनी कॅम्प येथील जो गुरुद्वारा आहे त्यांना यासंदर्भात विचारणा केलीय की, अशा गोष्टी घडताय तरी तुम्ही ते आम्हाला सांगत नाहीत. मात्र, ही प्रतिकृती उभारण्याअगोदर मी स्वतः दोन महिन्यांपूर्वी मंदिर प्रशासनाकडे जाऊन याबाबत माहिती दिली होती." तसंच यासंदर्भात आम्ही 40 गुरुद्वारांची भेट घेतली असून त्यांचंही सहकार्य आम्हाला लाभल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं.

प्रतिकृतीची केली जाणार पाहणी : पुढं निंबाळकर म्हणाले, "शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे शिष्टमंडळ शुक्रवारी (6 सप्टेंबर) आम्ही तयार केलेल्या सुवर्ण मंदिराच्या प्रतिकृतीची पाहणी करतील. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं आम्ही पालन करणार आहोत." दरम्यान, या अगोदर छत्रपती संभाजीनगर, उल्हासनगर तसंच कोलकाता येथे देखील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. मात्र, तेव्हा त्यांना कोणीही विरोध केला नाही. मग आता पुण्यातील सुवर्ण मंदिराच्या देखाव्याला विरोध का केला जातोय? असा सवाल गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा -

  1. गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' यंदा विराजमान होणार 'महाकाल' मंदिरात - Ganesh Galli 2024 Decoration
  2. गणपती बप्पा निघाले विदेशात : अमेरिका, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलियात गणेश मूर्तींना मागणी - Ganeshotsav 2024

Last Updated : Sep 5, 2024, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.