ETV Bharat / state

शिर्डीतील रविंद्रनं रक्त देऊन वाचवले मध्यप्रदेशातील महिलेचे प्राण - Rare Group Blood Donation

Rare Group Blood Donation : म्हटलं जातं की, रक्ताची नाती जन्मानं मिळतात; मात्र शिर्डीतील रवींद्र अष्टेकर याची जन्माची रक्ताची नाती नाहीत. मग तो शेकडो किलोमीटर दूर असलेली रक्ताची नाती कशी सांभाळतोय पाहूयात आमच्या "ई टीव्ही भारतच्या" विशेष रिपोर्टमध्ये

Rare Group Blood Donation
रक्तदान करताना रवींद्र अष्टेकर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 10:01 PM IST

अहमदनगर (शिर्डी) Rare Group Blood Donation : शिर्डीत फुलांची शेती करत त्याची विक्री करणारा रवींद्र अष्टेकर हा 36 वर्षीय तरुण आपल्या कुटुबीयांसमवेत राहतो. आता साधारणपणे कुटुंबातील व्यक्तींचे रक्तगट समान असतात; मात्र रविंद्रच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचा रक्तगट त्याच्याशी जुळत नाही. इतकचं काय तर अख्ख्या जिल्ह्यातही त्याचं रक्तगट कुणाशी जुळत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असा कोणता त्याचा रक्तगट आहे.

दुर्मिळ रक्तदान करून महिलेचे प्राण कसे वाचविले हे सांगताना रवींद्र अष्टेकर (ETV Bharat Reporter)

म्हणून रक्ताची नाती जपा : रविंद्रचा 'बॉम्बे' रक्तगट आहे. जो 1952 मध्ये शोधला गेला असे सांगितलं जातं. सामान्यत: चार लाखात एका व्यक्तीचा हा रक्तगट आढळतो. ह्या दुर्मिळ अशा रक्तगटात एच प्रतिजनची अनुपस्थिती आणि अँटी-एच प्रतिपिंडांची उपस्थिती आहे. हे रक्त 'बॉम्बे' रक्तगटाचा व्यक्ती त्याच रक्तगटाच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो; म्हणून या रक्तगटाच्या व्यक्तींना आपली रक्ताची नाती अधिक जपावी लागतात.

'हा' आहे दुर्मिळ रक्तगट : 'बॉम्बे' हा दुर्मिळ रक्तगट असल्याने या व्यक्तींना त्या गटाच्या व्यक्तीच्या संपर्कात राहावे लागते. कारण कधी कोणाला रक्ताची गरज पडली तर एकमेकांच्या मदतीला धावून जाता येते. रवींद्र अष्टेकरही त्या पैकीच एक 'बॉम्बे' रक्तगटाच्या व्यक्तीचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला असून त्याद्वारे रक्ताची गरज कळवली जाते.

O गटाचे रक्त दिल्याने प्रकृती बिघडली : गेल्या 25 मे रोजी मध्यप्रदेशातील इंदूर येथे याच रक्तगटाच्या एका गर्भवती महिलेची प्रकृती खराब झाली. तिला चुकून O रक्तगटाचे रक्त दिल्या गेल्याने तिची परिस्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे रक्त हवे होते. अशात शिर्डीच्या रविंद्रला रक्त देण्यासाठी कॉल केला गेला. त्यानेही त्या हाकेला साध देत मित्रांच्या गाडीने 440 किलोमीटरचा प्रवास करत रुग्णालय गाठत रक्तदान केले आणि त्या महिलेचे प्राण वाचवले.

अनेकदा गरजू रुग्णांना केले रक्तदान : गेल्या 10 वर्षांत रवींद्रने महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील विविध शहरांमध्ये गरजू रुग्णांना नऊ वेळा रक्तदान केले आहे. इंदूर येथील महिलेलाही वेळीच रक्त दिले गेल्याने तिच्या जीवाला धोका टळलाय. दुर्मिळ 'बॉम्बे' रक्तगट असलेलं हे रक्त साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे ह्या रक्ताची आवश्यकता पडल्यास रवींद्र सारख्या रक्तदात्यांनी वेळीच मदत करत आपल्या जन्माच्या रक्ताच्या नात्या बरोबरच आपल्या रक्तगटाची नातीही जपली आहे.

हेही वाचा :

  1. जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, भाजपानंही भरली हवा - Jayant Patil Congress Joins
  2. सुनील टिंगरे यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे; पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून पाठराखण - Pune Porsche Accident
  3. बहुप्रतीक्षित एक्झिट पोलचे निकाल जाहीर, पोलमध्ये भाजपाचं पारडं जड - Lok Sabha Election EXIT POLLS

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.