मुंबई - ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी परिसरात अंतिम संस्कार होणार आहेत.
Live Updates-
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर नेते हे उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.
- केंद्रीय मंत्री अमित शाह, पियूष गोयल यांनी रतन टाटा यांचं घेतलं अंतिम दर्शन
- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील एनसीपीए लॉनमध्ये रतन टाटा यांना अखेरचा आदरांजली वाहिली.
- रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना उद्योजक अनन्या बिर्ला यांनी म्हटले, "ते एक दूरदर्शी होते. आशा आहे की, आपण सर्वजण कठोर परिश्रम करू. त्यांचा वारसा पुढे नेऊ."
- आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणतात, " केवळ कॉर्पोरेट भारताचेच नाही तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या कामाच्या समृद्धीतून आपण त्यांचे स्मरण केले पाहिजे. आम्ही अनेक वर्षांपूर्वी भेटलो होतो. ते नेहमी देशाच्या हिताचा विचार करायचे.
- आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मुंबईत उद्योगपती रतन टाटा यांना अखेरचा श्रद्धांजली वाहिली. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, "श्री रतन टाटा यांच्याबद्दल दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पहिली, ते खऱ्या अर्थानं दूरदर्शी होते. दुसरे, ते कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील नैतिकतेवर दृढ विश्वास ठेवणारे होते. जेव्हा आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास लिहिले जाईल तेव्हा त्यांच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी पूर्ण खंड पुरेसा होणार नाही. ते भारताचे एक महान सुपुत्र होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहणार आहे. दुखवटाच्या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहेत. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "रतन टाटा यांचे पार्थिव दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत लोकांच्या श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती टाटा यांच्या नातेवाइकांनी कळविली आहे."
#WATCH | Maharashtra: Additional Commissioner of South Region, Mumbai Police Abhinav Deshmukh says, " the mortal remains of ratan tata will be kept at ncpa for the darshan between 10 am to 3.30 pm...all police arrangements will be made..." pic.twitter.com/BBDQzHFP9Z
— ANI (@ANI) October 10, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत रतन टाटा यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " रतन टाटा यांच्यामध्ये नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो."
#WATCH | Maharashtra deputy CM Ajit Pawar and NCP working president Praful Patel pay last respect to Ratan Tata, at NCPA lawns, in Mumbai pic.twitter.com/j1E6DyDOrf
— ANI (@ANI) October 10, 2024
रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते. येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. २०१२ मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते. २००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#WATCH | Mumbai | Paying tribute to Ratan Tata, entrepreneur Ananya Birla says, " he was a visionary. he put in so much hard work and discipline for so many years. hopefully, we all can work hard and take his legacy forward." pic.twitter.com/U53RjvAPlR
— ANI (@ANI) October 10, 2024
- उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातील उद्योगपती, राजकीय नेते आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी शोकमग्न भावना व्यक्त केल्या आहेत.
- दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त मुंबई पोलिस अभिनव देशमुख म्हणाले, "रतन टाटा यांचे पार्थिव NCPA येथे सकाळी 10 ते दुपारी 3.30 दरम्यान दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यादृष्टीनं सर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल.
#WATCH | Mumbai | Aditya Birla group chairman Kumar Mangalam Birla says, " it's a great loss for the country - not just for corporate india but the country as a whole. the impact of his work is quite unparalleled. we should remember him through the richness of his work. we met… https://t.co/hGJVsJhBJn pic.twitter.com/cwSuXu1HpX
— ANI (@ANI) October 10, 2024
जनतेला रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येणार- टाटा ग्रुपनं दिलेल्या माहितीनुसार रतन टाटा यांचे पार्थिव नरिमन पॉईंटमधील एनसीपीएच्या (National Centre for the Performing Arts-NCPA) लॉनमध्ये आज सकाळी साडेदहा वाजता ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी जनतेला रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येणार आहेत. नागरिकांनी एनसीपीएच्या लॉनमध्ये प्रवेश करण्यासाठी गेट 3 मधून प्रवेश करावा. बाहे जाताना गेट ३मधून बाहेर पडावे. त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा नाही. दुपारी 4 वाजता अंतिम यात्रा निघणार आहे. वरळीतील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आहेत.
#WATCH | Maharashtra | People pay last respect to Ratan Tata, at NCPA lawns, in Mumbai
— ANI (@ANI) October 10, 2024
The last rites will be held at Worli crematorium after 4 pm, today pic.twitter.com/S1YIYH9Xif
हेही वाचा-