मुंबई टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ते भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय उद्योगपती होते. ते केवळ उद्योगातील योगदानासाठीच नव्हे तर त्यांच्या परोपकारासाठी आणि दानशूरपणासाठी ओळखले जात होते.
1991 मध्ये रतन टाटा यांनी टाटा समुहाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कंपनीचे नेतृत्व करताना बदलत्या जागतिककरणाबरोबर आणि खुल्या अर्थव्यवस्थेशी सुसंगत निर्णय घेतले. 2012 मध्ये वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
- रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला होता. रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र होते.
- कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे रतन टाटा हे बालपणापासून अत्यंत नम्र आणि शांत वर्तनासाठी ओळखले जात होते.
- 1962 च्या शेवटी भारतात येण्यापूर्वी त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये जोन्स आणि इमन्ससोबत काही काळ काम केले. कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून स्थापत्यशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर त्यांनी पहिली नोकरी केली.
- रतन टाटा 1961 मध्ये टाटा समूहात रुजू झाले. त्यानंतर टाटा स्टीलमध्ये काम केले.
- 1991 मध्ये, जेआरडीच्या निवृत्तीनंतर त्यांनी टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून काम केले. टाटा समूहात त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांची परोपकारी अशी प्रतिमा निर्माण झाला.
- टाटामध्ये रतन टाटा यांचे शेवटचे स्थान एमेरिटस चेअरमन म्हणून होते. त्यांनी 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून काम केले. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत त्यांनी टाटा समुहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणूनही काम केले.
- रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहानं जागतिक पातळीवरील नामांकित असे ब्रँड खरेदी केले. त्यामध्ये टेटली, जॅग्वार लँड रोव्हर आणि कोरस कंपनीचा समावेश आहे. टाटांनी मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्रित समूहातून जागतिक व्यवसायात बदलण्याचा प्रयत्न केला.
- टाटा हे जगातील सर्वात मोठ्या परोपकारी लोकांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या मिळकतीतील सुमारे 60-65% धर्मादाय दान केले आहे. एका रिपोर्टनुसार 21 वर्षांमध्ये टाटांनी टाटा समूहाचे नेतृत्व केले. या काळात टाटा समुहाचा नफा सुमारे 50 पटीनं वाढला.
- 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार मिळाला.
- रतन टाटा यांनी निवृत्तीनंतर टाटा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून काम चालू ठेवले होते. यात सर रतन टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट, तसेच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट यांचा समावेश होता.
- केवळ टाटा समूहच नाही तर रतन टाटा यांनी तरुणांच्या कल्पक स्टार्ट अपमध्येदेखील गुंतवणूक केली. त्यांनी सुमारे 30 स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक करत उद्योजकतेला प्रोत्साहन दिले.
- रतन टाटा यांनी मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळांवर काम केले. टाटा हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष आणि कॉर्नेल विद्यापीठ आणि दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळावरदेखील होते.
हेही वाचा-