ETV Bharat / state

विनायक सावरकरांना भारतरत्न मिळाला नसल्याबाबत पणतू रणजीत सावरकर यांनी केलं मोठ वक्तव्य

Ranjeet Savarkar on Bharat Ratna : सध्या भारतरत्न पुरस्कारावरुन चांगलंच राजकारण तापलंय. यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया देत 'स्वातंत्र्यवीर' हा सन्मानच आमच्यासाठी मोठा आणि महत्त्वाचा असल्याचं म्हटलंय.

रणजीत सावरकर
रणजीत सावरकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 5:55 PM IST

मुंबई Ranjeet Savarkar on Bharat Ratna : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्कार आहे. परंतु, भारतरत्न पुरस्कारावरुन सतत वाद निर्माण झाल्याचं आपण पाहिलंय. यावर्षी भारतरत्न पुरस्कार बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना केंद्र सरकारनं जाहीर केलाय.

कर्पूरी ठाकूरांच्या 100 व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देखील भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळालं पाहिजे, अशी मागणी कित्येक वर्षापासून होत आहे. विरोधात असताना भाजपानंही सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी मागणी केली होती. मात्र आता सत्तेत आल्यानंतरही भाजपा सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का देत नाही? अशी चर्चा सुरू आहे. याबाबत विरोधकांनीही सवाल उपस्थित केलाय.

'स्वातंत्र्यवीर' हीच पदवी आमच्यासाठी महत्त्वाची : सावरकरांचे पणतू रणजीत सावकर म्हणाले, " स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आणि हा पुरस्कार जनतेनं दिलेला आहे. 'स्वातंत्र्यवीर' हा सन्मानच आमच्यासाठी मोठा आणि महत्त्वाचा असल्याचं सावरकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलंय. तसंच 'स्वातंत्र्यवीर' सावरकर यांनी स्वतःसाठी किंवा स्वार्थासाठी काही केलं नाही. देशसेवेला त्यांनी प्राधान्य दिलं. त्यामुळं त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, ही आमची मागणी कधी नव्हती आणि असणारही नाही, असंही रणजीत सावरकर म्हणाले.

जनतेपेक्षा शासन मोठं नाही : पुढं बोलताना रणजीत सावरकर म्हणाले की, "भारतरत्न हा पुरस्कार शासनाचा आहे. हा पुरस्कार अनेक चांगल्या लोकांना मिळालाय. तसा तो वादग्रस्त लोकांनाही मिळालाय. परंतु, जनतेचा कल महत्त्वाचा असतो. जनतेपेक्षा सरकार मोठं नाही. ज्या जनतेने 'स्वातंत्र्यवीर' सावरकर यांना 1923-24 साली 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी बहाल केलीय. त्याला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. जो 'स्वातंत्र्यवीर' हा जनतेनं पुरस्कार दिलाय. हाच आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आणि सन्मान असल्याचं आम्ही समजतो."

त्यांच्या विचारांवरुन चालणं हीच खरी श्रद्धांजली : पुरस्कार मिळणं किंवा न मिळणं या राजकारणात मला पडायचं नाही. पण 'स्वातंत्र्यवीर' सावरकरांना पुरस्कार मिळण्यापेक्षा त्यांचे विचार चांगले होते. त्या विचारावरुन चालणं किंवा त्यांच्या मार्गांवरुन चालणं हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे. हाच त्यांच्यासाठी मोठा पुरस्कार असल्याचंही रणजीत सावरकर म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सावरकरांच्या कोठडीत जातात अर्धा तास ध्यानस्थ बसतात, हीच खरी सावरकर यांना श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. मुख्य म्हणजे सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, ही मागणी करणाऱ्यांपैकी सावरकरांच्या कामाच्या पद्धतीवरून किंवा त्यांच्या विचारसरणीवरुन चालणारे कितीजण आहेत? असा सवालसुद्धा रणजीत सावरकर यांनी उपस्थित केलाय.

सावरकरांचं स्वप्न पूर्ण झालं : 'स्वातंत्र्यवीर' सावरकर म्हणाले होते की, राम हा या देशाचा प्राण आहे. आता राम मंदिरही झालेलं आहे. जे 500 वर्षापूर्वी मंदिर पाडलं होतं. तो आपला पराभव होता. यानंतर काश्मीर हा आपला अविभाज्य भाग आहे. तिथलं 370 कलम रद्द झालं पाहिजे, हे सावरकरांचं स्वप्न होतं. ते सावरकरांचे स्वप्न आताच्या सरकारनं पूर्ण केलंय. त्यामुळं सावरकरांच्या कामाच्या पद्धतीवरुन चालणं हीच खरी सावरकरांना श्रद्धांजली असल्याचंही रणजीत सावरकर म्हणाले.

हेही वाचा :

  1. रणजीत सावरकरांनी महात्मा गांधींच्या मृत्यूबाबत वादग्रस्त विधान का केलं? कुमार सप्तर्षींनी सांगितलं 'हे' कारण
  2. Nitin Gadkari On Karnatak Govt : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा वगळणे दुर्दैवी, नितीन गडकरींची कर्नाटक सरकारच्या निर्णयावर नाराजी
  3. प्रियांक खर्गे यांचं वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान, प्रतिमेला चप्पला मारून भाजप युवा मोर्चाकडून निषेध, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.