ETV Bharat / state

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मुंबईच्या सर्व जागा महायुती जिंकणार - रामदास आठवले - Ramdas Athawale Assurance - RAMDAS ATHAWALE ASSURANCE

Ramdas Athawale Assurance : मुंबईतील सर्व जागा महायुती जिंकणार आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी वरळी येथे आयोजित रिपाइं कार्यकर्त्यांच्या संमेलनात रामदास आठवले बोलत होते.

Ramdas Athawale Assurance
रामदास आठवले (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 10:54 PM IST

मुंबई Ramdas Athawale Assurance : पाचव्या टप्प्यात मुंबई आणि उपनगरात 20 मे रोजी मतदान होत आहे. जसे मतदान जवळ येत आहे तसे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होताना दिसत आहे. तसेच या निवडणुकीत आपणच जिंकणार आहोत, असं महाविकास आघाडी आणि महायुतीकडून दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आता पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी हे विकासपुरुष : दरम्यान, मोदी हे जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी देशाला वेगवान विकासाच्या मार्गावर भरधाव पुढे नेले आहे. नरेंद्र मोदी हे विकासपुरुष ठरले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी वरळी येथे आयोजित रिपाइं कार्यकर्त्यांच्या संमेलनात रामदास आठवले बोलत होते.

जाधव यांना बहुजनांच्या प्रश्नाची जाण : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव या लढाऊ उमेदवार आणि रणरागिणी आहेत. बौद्ध, आंबेडकरी जनतेच्या त्या भिमकन्या आहेत. त्यांना गरीब बहुजनांचे झोपडपट्टीवासियांचे प्रश्न त्या जाणतात. त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न आणि अडचणींची त्यांना जाण आहे. दक्षिण मुंबईमध्ये विकासाची कामे करून दक्षिण मुंबईला सोन्याची मुंबई करण्यासाठी यामिनीताई जाधव यांना निवडून दिले पाहिजे. त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी घरघरात जाऊन महायुतीचा प्रचार करावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. तसेच पुढे बोलताना आठवले म्हणाले की, नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मुंबईच्या सर्व म्हणजे सहाही जागा महायुती जिंकणार असा विश्वास आठवलेंनी बोलून दाखवला.

हेही वाचा :

  1. घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं भावेश भिंडेला उदयपूरमध्ये ठोकल्या बेड्या - Ghatkopar Incident
  2. राऊतांच्या 'त्या' आरोपानंतर हेलिकॉप्टमधून उतरताच निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी, मात्र... - lok sabha election
  3. विकासाच्या योजना घेऊन मतदारांसमोर जाणार; महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांचा निर्धार - Hemant Savara Announcement

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.