ETV Bharat / state

राम मंदिर निर्माण कार्याला 500 वर्षाचा संघर्ष : सरसंघचालक मोहन भागवत - Mohan Bhagwat On Ram Mandir - MOHAN BHAGWAT ON RAM MANDIR

Mohan Bhagwat On Ram Mandir : सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या दत्ताजी भाले स्मृती समितीच्या समर्पण या इमारतीचं लोकार्पण केलं. यावेळी मोहन भागवत यांनी "राम मंदिराला तब्बल 500 वर्षाच्या संघर्षाचा इतिहास आहे," असं स्पष्ट केलं.

Mohan Bhagwat On Ram Mandir
सरसंघचालक मोहन भागवत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 7:12 AM IST

छत्रपती संभाजीनगर Mohan Bhagwat On Ram Mandir : "राम मंदिरासाठी निधी जमा होईल का? याबाबत अनेकांना शंका होती. मात्र, ते होणार हे लोकांना माहीत होत, त्यामुळे ते मदत करण्यासाठी तयार होते. मंदिर होणार हे कळताच त्यांनी मदत दिली आणि खूप कमी वेळेत भव्य राम मंदिर उभारलं गेलं. राम मदिर उभारणीला तब्बल 500 वर्षाचा संघर्ष आहे," असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. "आधीच्या लोकांनी केलेल्या कामांमुळे आपल्याला आजचा दिवस दिसतोय. कुठलंही काम करताना पूर्ण समर्पण गरजेचं असते," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. स्वर्गीय दत्ताजी भाले स्मृती समितीतर्फे उभारलेल्या समर्पण या इमारतीच्या लाकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.

राम मंदिराला 500 वर्षांचा संघर्ष : "अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष आणि खूप त्याग केल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराचं स्वप्न साकार झालं. 500 वर्षांचा संघर्ष होता, मात्र मागील तीस वर्षांच्या राम मंदिर आंदोलनामुळे लोकांचा विश्वास वाढला. राम मंदिरासाठी निधी जमा होईल का? याबाबत अनेकांना शंका होती. मात्र, ते होणार हे लोकांना माहीत होत, त्यामुळे ते मदत करण्यासाठी तयार होते. मंदिर होणार हे कळताच त्यांनी भरभरून आर्थिक मदत दिली आणि खूप कमी वेळेत भव्य राम मंदिर उभारले गेलं," असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. छत्रपती संभाजीनगरातील दत्ताजी भाले स्मृती समिती कार्यालयाचं उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. "राम मंदिरांसाठी मागील पिढीतील अनेकांनी प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आपल्याला आजचा दिवस दिसतोय," असंही त्यांनी सांगितलं.

आजच्या पिढीला अनेक गोष्टी माहीत नाहीत : "आजच्या पिढीतील 57 टक्के युवकांना विभाजन, आणीबाणी माहिती नसतील. आनंदाच्या क्षणी ज्यांच्यामुळे आपण ह्या आनंदात आहे, त्यांच स्मरण स्वाभाविक असायला हवं. त्यांच्या परिश्रम आणि तपश्चर्येमुळेच अच्छे दिन येतात. श्रेय न घेता अनेक लोक आपली कर्तव्य पार पाडतात. जगात आपली प्रतिष्ठा वाढली आहे. आपल्या संस्कृतीबद्दल जगातील इतर देशात उत्सुकतेनं आणि आकर्षण वाढलं असून देश निर्मितीचा आजचा आनंद आपलं उद्याचं कर्तव्य आहे," असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. "श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे जनमानसात असणारे गुण आहेत. समाजात भक्ती आणि समर्पण जागवणं, त्यात सातत्य ठेवणं हेच संघाचं काम असल्याचं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं. तर राम आणि रावण दोघंही ज्ञानी होते, शिवभक्त होते. दोघंही आपल्या जागी श्रेष्ठ होते. मात्र रावणाला अहंकार होता आणि रामाला तो नव्हता. त्यामुळे नंतर काय झालं ते आपल्याला माहीत असल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलं. त्याच बरोबर ज्ञान आणि कर्माला भक्तिची जोड हवी, ती असली की सुखद परिणाम येतात. भेद, स्वार्थ तसेच शोषणमुक्त समाज घडविण्यासाठी संघ कटीबद्ध आहे," असं त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. कट्टरतेच्या भिंती तोडून एकसंध भारत बनवणं हे आपलं कर्तव्य - डॉ. मोहन भागवत
  2. संविधानाला सुरक्षित ठेवणं सरकारबरोबर आपलीही जबाबदारी- मोहन भागवत
  3. जगात भारत आपलं ध्येय पूर्ण करतो, बाकीचे फक्त गप्पा मारतात - मोहन भागवत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.