ETV Bharat / state

राज्यसभेच्या 6 जागांवर कुणाची लागणार वर्णी? उद्धव ठाकरे, शरद पवार गटाला फटका

Rajya Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून निकाल 29 फेब्रुवारीला जाहीर होतील. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधरन, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.

Rajya Sabha Election 2024
Rajya Sabha Election 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 4:39 PM IST

मुंबई Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या 56 रिक्त जागांसाठी फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणार आहे. या 56 जागांपैकी महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बंडखोरीमुळं उद्धव ठाकरे तसंच शरद पवार गटाला चांगलाच फटका बसणार आहे. राज्यातील आमदारांच्या पक्षनिहाय संख्याबळाच्या आधारे भाजपाचे 3 उमेदवार, अजित पवार गटातील 1 तसंच शिंदे गटातील प्रत्येकी 1 उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण निवृत्त होत आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे तसंच शरद पवार गटाला या दोन्ही जागा गमवाव्या लागण्याची शक्यता आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरेंना फटका : राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या 6 खासदारांमध्ये भाजपाचे नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन यांचा समावेश आहेत. तसंच काँग्रेसचे कुमार केतकर, उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई, शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. राज्यात फुटीरतावादी राजकारणाचा फटका शरद पवार तसंच उद्धव ठाकरे गटाला बसणार आहे. विधानसभेतील सध्याचं पक्षीय संख्याबळ पाहिल्यास, भाजपा सहज 3 जागा जिंकण्याची शक्यता आहे. कारण भाजपाकडं सध्या 104 आमदार आहेत. तसंच 13 इतर आमदारांची त्यांना मदत मिळू शकते. काँग्रेसकडे 45 आमदार असून त्यांचा एक उमेदवार निवडून येण्यास कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे यांना 40 आमदारांचा पाठिंबा असून अन्य पक्षांच्या आमदारांचाही पाठिंबा आहे. यामुळं शिंदे गटाचा 1 उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या जवळपास 43 आमदारांनी अजित पवारांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. या संख्येच्या आधारे अजित पवार गटाचाही 1 उमेदवार निवडून येऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडं 14 तसंच शरद पवार यांच्या गटाकडं जवळपास 10 आमदार असल्यानं दोन्ही पक्षांनी एकत्र येत संयुक्त उमेदवार उभा केला, तरी त्यांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही.

व्हिप कळीचा मुद्दा : अकोला पश्चिमचे भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झाल्यानं एक जागा अजून रिक्त झाली आहे. तसंच शिंदे गटाचे सांगली खानापूरचे आमदार अनिल बाबर यांचंही आजच निधन झाल्यानं ती जागा देखील रिक्त आहे. यामुळं राज्यातील एकूण 288 पैकी 286 आमदार मतदान करणार असून मतदानाचा कोटा हा 41 असणार आहे. त्यामुळं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यातील महायुतीला एकूण 6 जागांपैकी 5 जागा मिळणार असून 1 जागा काँग्रेसला मिळेल. राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीनं मतदान असल्यानं मतांची फोडाफोडी होण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीमध्ये मतदान झालं, तर शिंदे गटाने नेमलेले प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप ठाकरे गटाला मान्य करावा लागणार आहे. त्याचबरोबर मतदान खुल्या पद्धतीनं असल्यानं ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिपच्या विरोधात मतदान करता येणार नाही. त्यामुळं हा कळीचा मुद्दा बनणार आहे.

कुणाची वर्णी लागणार : भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, प्रकाश जावडेकर हे तीन खासदार निवृत्त होत आहेत. त्यापैकी नारायण राणे यांना रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत पक्षात मंथन सुरू आहे. तर प्रकाश जावडेकर यांना पुन्हा खासदारकी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तसंच खासदार व्ही. मुरलीधरन यांच्या बाबतचा निर्णय दिल्लीतूनच अपेक्षित आहे. तसंच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बिहारमध्ये सत्ता स्थापनेत बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल बक्षीस म्हणून राज्यसभेची खासदारकी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पक्षात नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचीही राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच विजया रहाटकर यांचंही नाव सध्या चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये कुमार केतकर निवृत्त होत असून त्यांच्या जागेवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेच अंतिम निर्णय घेतील. एकनाथ शिंदे गटाकडून आत्ताच काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात समाविष्ट झालेले मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का :

  1. सरकार 'सूएझ' कालव्याच्या धर्तीवर तीन राज्यांना जोडणारा जलमार्ग करणार, फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना
  2. बंगालमध्ये 'भारत जोडो न्याय यात्रे'वर दगडफेक, राहुल गांधींच्या कारची काच फुटली
  3. "भुजबळ स्वाभिमानी असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा", विरोधी पक्षनेत्याचं आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.