हैदराबाद IPL 2025 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 हंगामासाठी दोन दिवसीय मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस पडलाय. यावेळी आयपीएल मेगा लिलावात प्रवेश करणारा तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. वैभव सूर्यवंशी यांची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. पण त्याला राजस्थान रॉयल्सनं 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी केलंय.
13 YEAR OLD VAIBHAV SURYAVANSHI BECOMES CROREPATI. 🤑pic.twitter.com/UkrAhZiew8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 25, 2024
वैभवला विकत घेण्यासाठी 2 संघ भिडले : स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीचं नाव जेव्हा लिलावासाठी समोर आलं, तेव्हा त्याला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये लढत झाली. दरम्यान, वैभव सूर्यवंशीची किंमत 30 लाखांवरून वाढून 1.10 कोटींवर जावून थांबली. शेवटची बोली राजस्थान संघानं लावली. तर दिल्लीनं बोलीतून मघार घेतली. आता वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 च्या मोसमात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाकडून खेळणार आहे.
13 वर्षीय वैभव हा सर्वात तरुण खेळाडू : यावेळी लिलावाच्या यादीत समाविष्ट झालेला बिहारचा वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला होता. त्यांचं सध्याचं वय 13 वर्षे 234 दिवस (16 नोव्हेंबर 2024) आहे. वैभव सूर्यवंशी बिहारकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. वैभवनं या वर्षी जानेवारीत मुंबईविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वैभवला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती, वैभवचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर येथे झाला. वैभवचे वडील संजीव यांनी त्याला वयाच्या पाचव्या वर्षापासून नेटमध्ये सराव करायला सुरुवात केली. वैभवच्या वडिलांनी यासाठी घरी जाळी बसवली. त्यानंतर वैभवला समस्तीपूरच्या क्रिकेट अकादमीत दाखल करण्यात आलं. यानंतर वैभवने मनीष ओझा यांच्याकडून पटना येथील जीसस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलं.
हे वाचलंत का :
- 72 खेळाडू, 4679500000 रुपये... IPL Auction च्या पहिल्या दिवशी पडला पैशांचा पाऊस; वाचा संपूर्ण यादी
- कुठुन येतो इतका कॉन्फिडन्स? पहिला सामना हरल्यानंतरही दुसऱ्या सामन्याच्या 16 तासांआधी प्लेइंग 11 जाहीर
- पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकत झिम्बाब्वे इतिहास रचणार की भारताचे शेजारी प्रतिष्ठा राखणार? निर्णायक वनडे 'इथं' पाहा लाईव्ह