ETV Bharat / state

सहलीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बसमधील अनेक विद्यार्थी जखमी - NAGPUR BUS ACCIDENT

सरस्वती शाळेच्या सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात झाला. अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळावर बचावकार्य सुरू असून विद्यार्थ्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं.

Nagpur Bus Accident
अपघातग्रस्त बस (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 11:35 AM IST

नागपूर : विद्यार्थांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर इथल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांची सहल : सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आज वर्धा जिल्ह्यातील बोरधरण इथं जात होती. यावेळी पेंढरी गावाजवळ बसला अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा दुर्दवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढं आली आहे, मात्र त्याला कोणताही दुजोरा अद्याप मिळाला नाही. आज सकाळी एकूण 5 बस विद्यार्थ्यांना घेऊन बोरधरणच्या दिशेनं जाताना चार बस पुढं निघाल्या. तर शेवटी असलेल्या बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बसला अपघात झाला. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना नागपूरच्या मिहान येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर एका विद्यार्थिनीचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पुढं येत आहे. हिंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. बस उलटून भीषण अपघात; 7 प्रवाशांचा मृत्यू अनेक गंभीर
  2. निवडणूक कर्तव्य बजावून घरी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवलं, तलाठी जागीच ठार
  3. कॉमेडियन कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्तानं माखलेला टिसू पाहून चाहत्यांना बसला धक्का
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.