ETV Bharat / entertainment

"ते मला वडिलांसारखे आहेत, थोडी लाज बाळगा", रहमानशी नाव जोडलं गेल्यानं मोहिनी डे झाली भावूक, इमोशनल व्हिडिओ शेअर - MOHINI DEY BECAME EMOTIONAL

बासिस्ट मोहिनी डे हिचं नाव एआर रहमान यांच्याशी जोडलं गेल्यानंतर यापूर्वीच तिनं याचा इन्कार केला होता. आता तिनं एक इमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे.

MOHINI DAY AR RAHMAN
मोहिनी डे आणि एआर रहमान ((ANI/IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 12:22 PM IST

मुंबई - संगीतकार एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या विभक्त झाल्यानंतर ज्या अनेक अफवा पसरल्या त्यामध्ये मोहिनी डे हे एक नाव होतं. एआर रहमानचं नाव तिच्याशी जोडण्यात आलं आणि त्याच्या सवंग चर्चा माध्यमातून घडू लागल्या. त्याला एक कारणही कारणीभूत ठरलं होतं, ते म्हणजे रहमाननं सायरा बानोपासून वेगळं होण्याची घोषणा केली तेव्हा काही तासांनंतर मोहिनीनेही पतीबरोबर ब्रेकअप होत असल्याची घोषणा केली होती. यानंतर, मोहिनीचे नाव संगीतकार रहमान यांच्याशी जोडलं जाऊ लागलं. रहमान हे मोहिनेपेक्षा 29 वर्षांनी जास्त वयाचे आहेत आणि त्यांच्या लिंकअपच्या बातम्या पसरल्यानं दोघांच्याही चाहत्यांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर रहमानची मुलगी आणि मुलगा यांनी या सर्व अफवा खोट्या असल्याचं सांगत यामुळे नाहक वेदना होत असल्याचं सांगितलं आणि वडिलांची बदनामी होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हा गदारोळ उडाल्यानंतर मोहिनीनंही एक इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान आता मोहिनीनं एका व्हिडिओ पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली असून यादरम्यान ती भावूकही झाल्याचं पाहायला मिळालं.

तिच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मोहिनीनं लिहिलं की, माझ्या आणि एआर रहमानबद्दल अशा निरुपयोगी गोष्टी बोलल्या जात आहेत यावर माझा विश्वास बसत नाही, हे खूपच दुःखद आहे आणि मी अशा भावनिक गोष्टींबद्दल आदर आणि सहानुभूती दाखवणार नाही लोक खूप मानसिक आजारी आहेत, रहमान सर एक आख्यायिका आहेत, ते माझ्या वडिलांसारखे आहेत. मोहिनीने पुढे लिहिलं आहे की, मला कोणाचेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, परंतु अशा गोष्टींमुळे कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, त्यामुळे कृपया, खोट्या बातम्या पसरवणे टाळा, आमच्या गोपनीयतेचे उल्लंघन करू नका.

मोहिनीनं आपल्या व्हिडिओत म्हटलंय की, "माझ्या आयुष्यात अनेकजण वडिलांप्रमाणे आहेत, रोल मॉडल्स आहेत. मी खरंच भाग्यवान आहे की, अशी माणसं माझ्या जीवनात आली ज्यांचा मला घडवण्यात मोठा वाटा आहे. एआर रहमान हे देखील त्यापैकीच एक आहेत. मी त्यांचा खूप आदर करते, ते मला वडिलांसमान आहेत. ते माझ्या वडिलांहून तरुण आहेत, परंतु त्यांची मुलगी अगदी माझ्या वयाइतकी आहे. आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांच्या बँडबरोबर साडे आठ वर्ष एक बासिस्ट म्हणून काम केलं आहे. पाच वर्षापूर्वी मी यूएसमध्ये माझ्या इतर सहकलाकारांसह जोडली गेली. माझाही एक बँड आहे पण त्याबद्दल सांगायचं तर खूप मोठं होईल. थोडक्यात कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा. ही एक खासगी गोष्ट आहे आणि खूपच वेदना होतात.", अशा आशयाचं निवेदन मोहिनीनं माध्यमातून केलं आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.