ETV Bharat / state

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी महायुती मराठा उमेदवाराला संधी देणार? - Rajya Sabha By Election 2024 - RAJYA SABHA BY ELECTION 2024

Rajya Sabha By Election : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आपल्या बाजूनं करण्यासाठी महायुती राज्यसभा पोटनिवडणुकीत मराठा कार्ड खेळण्याची शक्यता आहे. यासाठी विनोद तावडे, रावसाहेब दानवे आणि नितीन पाटील या मराठा चेहऱ्यांना पोटनिवडणुकीत संधी देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातय. मात्र, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठा म्हणून नव्हे, तर क्षमता असलेले नेते म्हणून त्यांचा विचार करत असल्याचं महायुतीनं स्पष्ट केलय.

Rajya Sabha By Election 2024 Possibility of Mahayuti giving chance to Maratha candidate
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 3:58 PM IST

Updated : Aug 12, 2024, 4:21 PM IST

मुंबई Rajya Sabha By Election : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या 12 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीला 9 जागांवर विजय संपादित करता आला. त्यामुळं मनोबल उंचावलेल्या महायुतीनं आता राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी तयारी केल्याचं बघायला मिळतय. राज्यसभेचे सदस्य असलेले सदस्य लोकसभेवर निवडून गेल्यानंतर 10 जागा रिक्त झाल्या आहेत. तसंच रिक्त झालेल्या 10 जागांपैकी 7 जागा या भाजपाच्या, तर दोन जागा काँग्रेसच्या आणि 1 जागा आरजेडीची आहे. या जागांमध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश आहे. येत्या 3 सप्टेंबरला या जागांसाठी पोटनिवडणूक होत असून महाराष्ट्रातील जागेसाठी महायुतीमधील भाजपाचा एक आणि दुसऱ्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार दिला जाणार आहे.

केशव उपाध्ये आणि संजय तटकरे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता : विधिमंडळातील महायुतीचे संख्याबळ पाहता महायुतीकडं भाजपाचे 106 आमदार आणि मित्र पक्षांचे 80 तर दहा अपक्षांचे बळ असं एकूण 196 आमदारांचं संख्याबळ आहे. तसंच महाविकास आघाडीकडून या जागा लढवण्याबाबत कोणताही विचार नसल्याचं सध्या तरी बघायला मिळतय. त्यामुळं या दोन्ही जागा महायुतीच्याच बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. यातील राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुदत 5 एप्रिल 2026 रोजी संपणार असल्यानं त्यांच्या जागेवर निवडून येणाऱ्या उमेदवाराला केवळ पावणेदोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. तर राज्यसभा खासदार पियूष गोयल यांचा कार्यकाल 4 जुलै 2028 पर्यंत असल्यानं त्यांच्या जागेवर निवडून येणाऱ्या उमेदवाराला चार वर्षाचा कालावधी मिळणार आहे.

महायुतीकडून राज्यसभेसाठी मराठा कार्डचा वापर : या पोटनिवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतचा निर्णय संसदीय पक्ष घेईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नुकतीच साताऱ्यात एक घोषणा जरी केली असली तरी याबाबतचा अंतिम निर्णय हा पक्षाच्या बैठकीतच घेतला जाईल, असं भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं. तसंच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसारच उमेदवार दिला जाईल, हे सुद्धा उपाध्ये यांनी स्पष्ट केलय. तर याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरे म्हणाले, "भाजपानं साताऱ्यातील लोकसभेचा उमेदवार हा त्यांचाच असावा यासाठी आग्रह धरला होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळं तेव्हा ठरल्यानुसार आता राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळणं क्रमप्राप्त आहे." तसंच लवकरच याची स्पष्टता होईल, असंही ते म्हणाले.

तावडे, दानवे आणि पाटील असणार उमेदवार : गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज पेटून उठल्याचं बघायला मिळतय. याचा जोरदार फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळं येत्या निवडणुकीत मराठा समाजाला आपल्या बाजूनं करण्यासाठी महायुती मराठा कार्ड खेळण्याची शक्यता आहे. यासाठी प्रदीर्घ अनुभव असलेले माजी खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय नेते विनोद तावडे यांची उमेदवारी निश्चित केली जाऊ शकते. तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं सातारा जिल्ह्यातील नेते नितीन पाटील यांची उमेदवारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीनंतर मराठा समाजाचा रोष कमी होतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील 'या' 2 जागांचा समावेश, कधी होणार मतदान? - Rajya Sabha Election 2024

Last Updated : Aug 12, 2024, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.