पुणे Raju Shetty On Democracy : सध्या आपण जे राजकारण पाहत आहे त्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही. (Youth Parliament Pune) गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागला आहे. (former MP Raju Shetty) यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावं, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे.
'या' मान्यवरांना देण्यात आला पुरस्कार: जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित ७ व्या युवा संसदेचे उद्घाटन नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी आदर्श खासदार पुरस्कार हा खासदार संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना तर आदर्श नगरसेवक माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना, आदर्श सरपंच हा सरपंच दिलीप घोलप यांना आणि आदर्श युवक पुरस्कार हा उद्योजक सनी निम्हण यांना देण्यात आला.
राजकारण ही सामाजिक सेवेची संधी: यावेळी राजू शेट्टी म्हणाले, तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी आपण राजकारणात कशासाठी येणार आहोत, हे उद्दिष्ट निश्चित करावं. राजकारण म्हणजे केवळ पैसा, प्रसिद्धी, सत्ता मिळवण्याचं साधन नाहीये. राजकारण हे समाजाची सेवा करण्याची एक संधी आहे आणि हेच तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण जर सकारात्मकतेनं केलं तर जनता निश्चितच आपल्या पाठीशी उभी राहते हे मी वैयक्तिक अनुभवातून आपल्याला सांगतो. राजकारणामध्ये अनेक समस्या असल्या तरी या देशाला हुकूमशाहीपेक्षा लोकशाहीच पुढे नेऊ शकते. त्यामुळे या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे.
तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात: ओमराजे निंबाळकर म्हणाले, राजकारणामध्ये निष्ठा कायम ठेवली तर यश निश्चितच मिळते. राजकीय सूडापोटी माझ्या वडिलांचा खून झाल्यानंतर मी लोकांच्या प्रेमापोटी राजकारणामध्ये आलो. आज तळागाळातील लोकांपर्यंत माझे काम पोचल्यामुळे त्यांना मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो, हे माझ्या राजकारणाचं यश आहे. केवळ लोकांना दाखवण्यासाठी म्हणून काम करू नका. समाजाविषयी तळमळ तुमचा कामातून दिसली तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात.
हेही वाचा: