ETV Bharat / state

विदर्भात कुठेही कत्तलखाना होऊ देणार नाही, वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - Nagpur Kattalkhana

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 6:13 PM IST

Nagpur Kattalkhana : उमरेड तालुक्यातील सुरगाव येथे होणाऱ्या कत्तलखान्यावर (Kattalkhana) वातावरण चांगलच तापलं आहे. येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. अन्यथा विदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा, वारकरी संप्रदायाकडून देण्यात आला आहे.

Nagpur Kattalkhana
कत्तलखान्याला विरोध (ETV BHARAT Reporter)

नागपूर Nagpur Kattalkhana : उमरेड तालुक्यातील सुरगाव येथे तयार होत असलेल्या कत्तलखान्याला (Kattalkhana) विरोध करण्यासाठी, आज वारकरी संप्रदायाच्या लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतली. नागपूर येथील शासकीय निवासस्थानी ही भेट घेण्यात आली. माजी आमदार राजू पारवे (Raju Parve) यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते.

प्रतिक्रिया देताना माजी आमदार राजू पारवे (ETV BHARAT Reporter)

अधिकाऱ्यांना दिल्या सूचना : पवनगाव येथे होणारा कत्तलखाना हा कोर्टाच्या आदेशानंतर उमरेड रोडवरील सुरगाव येथे होत आहे. नागपूर जिल्ह्यात कुठेही हा कत्तलखाना होऊचं देणार नाही अशी भूमिका, वारकऱ्यांनी घेतली आहे. या विषयाच्या अनुषंगानं वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेतली. वारकऱ्यांचं पूर्ण म्हणणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच जिल्हाधिकारी आणि एनएमआरडीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात अवाहन दिलं जाणार आहे.

उमरेड तालुक्यातील सुरगाव येथे होणाऱ्या कत्तलखाण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी अशी मागणी, वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी वकील नेमण्याची वेळ आमच्यावर आलेली असून हे फार दुर्दैवी आहे. हा कत्तलखाना येथे झाला तर निष्पाप प्राण्यांचा बळी देण्यासाठी सर्वात पहिला बळी माझा असेल. - ओमदेव महाराज चौधरी, वारकरी

तीव्र आंदोलनाचा इशारा : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, उद्या दुसरे मुख्यमंत्री आले तर पुन्हा आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. येत्या १५ दिवसात जर सकारात्मक निर्णय न आल्यास विदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा वारकरी संप्रदायाकडून देण्यात आलाय.

जनावर तस्करांविरुद्ध कारवाई : 10 जून रोजी अहमदनगर ते अहमदपूर मार्गावर नेकनूर येथे गाई घेऊन जाणारा एक टेम्पो पकडण्यात आला होता. याच टेम्पोमध्ये जवळपास 30 गाई होत्या. त्याच्यानंतर याच मार्गावर हैदराबादकडं तब्बल 35 बैल घेऊन जाणारी चारचाकी पकडण्यात आली होती. त्यामुळं जनावरांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा -

  1. भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याच्या अवैध कत्तलखान्यावर छापेमारी; १९०० किलो मांस जप्त
  2. शहरातील कत्तलखाना बंद करण्यासाठी मुदखेडकरांचा बंद
  3. उस्मानाबादेत कत्तलखाना व कत्तलीसाठी जनावरं नेणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.