ETV Bharat / state

राज ठाकरेंची हिंदुत्वासाठी व्यापक भूमिका; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला सत्तेचा 'राज'मार्ग - MAHARASHTRA ELECTION 2024

राज ठाकरे यांची भूमिका बदलली असून, त्यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राज ठाकरेंची पाठराखण केलीय.

Devendra Fadnavis and Raj Thackeray
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2024, 5:26 PM IST

Updated : Oct 31, 2024, 7:01 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा देणारे राज ठाकरे यांनी राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि ते देवेंद्र फडणवीस असतील, असं म्हटल्यानं राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरलाय. राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. तर अमित ठाकरे यांच्या विजयासाठी भाजपाने कंबर कसली आहे. यावरून मनसे आणि भाजपची जवळीक मोठ्या प्रमाणात वाढली असून," मिले सुर मेरा तुम्हारा, तो स्वर बने हमारा" या पद्धतीने सध्या यांच्या छुप्या युतीकडे बघितलं जातंय. त्यातच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढणाऱ्या मनसेला उत्तर भारतीयांची मतं भेटणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता, राज ठाकरे यांची भूमिका बदलली असून, त्यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राज ठाकरेंची पाठराखण केलीय. मुंबईत प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

मुख्यमंत्रीसुद्धा महायुतीचाच होणार : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल व ते देवेंद्र फडणवीस असतील असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांच्या शुभेच्छा त्यांनी आभाराने स्वीकारल्या आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, राज्यात भाजपचे नाही तर महायुतीचे सरकार येणार असून मुख्यमंत्री सुद्धा महायुतीचाच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेत आता बदल झाला आहे. राज ठाकरे यांनी आता व्यापक हिंदुत्वाची भूमिका हाती घेतली आहे. क्षेत्रीय अस्मितेला सुद्धा भाजपचं नेहमीच समर्थन राहिलं आहे. परंतु राष्ट्रीय अस्मितेचा सुद्धा विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि ही राष्ट्रीय अस्मिता म्हणजेच हिंदुत्व हे आता राज ठाकरेंनी स्वीकारले आहे, असेही फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर अमित ठाकरे यांना माहीम मध्ये पाठिंबा देण्याबाबत आमची बोलणी सुरू आहेत. आम्ही सर्व एकत्र येऊन यातून मार्ग निघाला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

जवळपास सर्व अडचणी संपवल्या गेल्या : राज्यात सुरू असलेल्या बंडखोरीच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बंडखोरी शमवण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काही ठिकाणी क्रॉस फॉर्म आले होते. यासंदर्भामध्ये काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आमच्या सर्व नेत्यांची बैठक झाली आणि यामध्ये जवळपास सर्व अडचणी संपवल्या गेल्यात आणि क्रॉस फॉर्म परत घेतले जातील. पक्षांतर्गत बंडखोरी झाली असून, त्यासंदर्भातसुद्धा योग्य दिशेने चर्चा सुरू आहे. बंडखोर उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी तिन्ही पक्षांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

गोपाळ शेट्टींची समजूत काढू : माजी खासदार गोपाळशेट्टी यांना विधानसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांनी बोरीवली मतदारसंघांमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोपाळ शेट्टी भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ता आहेत. ते अनेकदा आग्रही असतात परंतु ते पक्ष शिस्त सुद्धा मान्य करतात. गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच ते नेहमीप्रमाणे भाजपाच्या मागे राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

हेही वाचा -

  1. भाजपाचा मुख्यमंत्री अन् मनसे सत्तेत असेल, राज ठाकरे आताच असं का म्हणाले?
  2. मतदारसंघ 21 आणि उमेदवार 1272, 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 उमेदवार रिंगणात

Last Updated : Oct 31, 2024, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.