मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळं सर्वत्र राजकीय चर्चा पाहायला मिळत आहेत. दरम्यान, सोमवारपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. समोवारी वसुबारस असल्यानं मुंबईसह राज्यभर वसुबारस आणि दिवाळीच्या सण साजरा करण्यात आला. याच धरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवाळीला प्रत्येक वर्षी शिवाजी पार्क येथे भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करते. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षीप्रमाणे मनसेनं अतिशय भव्य-दिव्य, आकर्षक आणि देखणा दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं.
दीपोत्सवाला सेलिब्रेटींची हजेरी : या दीपोत्सवाचा आज पहिलाच दिवस असल्यामुळं या कार्यक्रमाला आज 'सिंघम अगेन' या चित्रपटाची टीमनं हजेरी लावली. यात निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगन, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आदींनी उपस्थिती लावली होती. तर एकीकडं या दीपोत्सवाला दिव्याचे तारे तर दुसरीकडं चित्रपट चित्रपटसृष्टीत सितारे हजेरी लावल्यामुळं दीपोत्सव अधिकच बहरला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे तसेच माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे अमित ठाकरे देखील उपस्थित होते.
येथे एक सिंह आलाय : दरम्यान, राज ठाकरे म्हणाले की, "तुम्ही सर्व सेलिब्रेटी आज आमच्या दीपोत्सव कार्यक्रमाला आला. त्याबद्दल मी तुमचे स्वागत करतो आणि दिवाळीच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि 1 तारखेला रोहित शेट्टी यांचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट का आहे हे मला सांगण्याची गरज नाही. स्वतः चित्रपटातील अजय देवगन यांच्या रूपाने येथे एक सिंह आलेला आहे. रोहित शेट्टी यांचे चित्रपट हे मराठमोळे असतात. त्यांच्या चित्रपटात अनेक मराठी कलाकार असतात. शिवाजी पार्कवरील या मराठमोळ्या वातावरणात हे सर्व कलाकार यावेत, अशी माझी इच्छा होती. हे सर्व अभिनेते अजय देवगन, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आणि रोहित शेट्टी आले. त्यामुळं मी तुम्हां सर्वांचे आभार मानतो". हे आल्यामुळं या सेलेब्रिटींना तुम्हा सर्वांना पाहता आलं. तर हा बारा वर्षांपासून मनसेचा दीपोत्सव आहे. या दीपोत्सवाचा आस्वाद घ्या.
सिंघमला महाराष्ट्रातून खूप प्रेम : प्रत्येक वेळेस सिंघम या चित्रपटात अनेक मराठी कलाकार असतात. सिंघम चित्रपटाला महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळालं त्यामुळं हा सिनेमा हिट झाला. आमचा पुढचा सिंघमचा पार्ट येतोय, त्याच्यावरही असंच प्रेम करा असं रोहित शेट्टी म्हणाला. तर अर्जून कपूर, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सिंघम अगेन चित्रपटाच्या टीममधील सर्व कलाकारांचा राज ठाकरे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
हेही वाचा -
- आदित्य-अमित ठाकरे बंधू नातं जपणार आणि आमदारकीही मिळवणार, वरळीतून मनसे तर माहिममधून उबाठा घेणार माघार?
- मुख्यमंत्र्यांची सरवणकरांबरोबर रात्री बैठक, माहीमच्या जागेवर तोडगा निघेना; 'राज'पुत्रासाठी भाजपाचा शिंदेंवर दबाव?
- अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात; विधानसभेसाठी मनसेच्या 45 उमेदवारांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी