ETV Bharat / state

संविधानावर ते थेट नाही लपून हल्ला करतात -राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. ते आज महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

Rahul Gandhi Maharashtra Visit updates
राहुल गांधी नागपूर दौरा (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 2 hours ago

नागपूर- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, " संविधान फक्त पुस्तक नाही तर जगण्याचा अधिकार आहे. संविधान सर्वांना अधिकार देते. ते संविधानावर थेट हल्ला करत नाहीत, लपून हल्ला करतात. एक व्यक्ती देशाचं भवितव्य हिसकावून घेईल, असे संविधानात लिहिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोट्यवधी लोकांचा आवाज होते. गांधी आणि आंबेडकर यांच्या मुखातून जनतेचा आवाज निघायचा. जाती आधारित जनगणना झाली पाहिजे. जातीगणनेचं खरं नाव हक्क आहे. संविधान नसते, तर निवडणूक आयोगही राहीला नसता. सामान्याला सत्ता, शक्तीची गरज आहे. सत्तेशिवाय सन्मान मिळणार नाही."

Live updates

  • राहुल गांधी म्हणाले, " जातीगणनेच्या मागणीमुळे मोदींची झोप उडाली आहे. काहीही चर्चा करा. जातीनिहाय जनगणना होणार आहे. जातीनिहाय जनगणनेवर बोललो की मोदी म्हणतात देश तोडला जात आहे. जातीनिहाय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे."
राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट (Source- ETV Bharat)
  • काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचे नागपुरात आगमन झाले आहे. नागपूर विमानतळावरून राहुल गांधी थेट दीक्षाभूमी येथे दाखल झाले आहे. आज राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दीक्षाभूमी येथूनचं खऱ्या अर्थाने प्रचाराला नारळ फोडणार आहेत. त्यानंतर ते आज संध्याकाळी मुंबईचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी ते संविधान सन्मान संमेलनामध्ये काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे संविधान सन्मान संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सुरेश भट सभागृहात संविधान सन्मान संमेलन होणार असून राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहे. संविधान सन्मान संमेलनात अनेक बुद्धिजीवी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

आज संध्याकाळी आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेसाठी काँग्रेसच्या गॅरंटी जाहीर करणार आहोत. सत्ताधारी महायुती आघाडी सरकारचा भ्रष्ट कारभार, महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे कसा गहाण ठेवला, याविषयी माहिती देणार आहोत-काँग्रेसचे प्रवक्ते, अतुल लोंढे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महाविकास आघाडीची सभा घेणार आहेत. बीकेसी मैदानावरील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे (एसपी) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेतेदेखील संबोधित करणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या भोवती अराजक पसरविणारे लोक असल्याची टीका केली. या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले, "भाजपानं राहुल गांधींच्या कार्यक्रमाला 'नौटंकी' म्हटले तर त्याचा अर्थ भाजप घाबरत आहे. कार्यक्रमाला 'शहरी नक्षलवादी' म्हणणे हा समाजाचा अपमान आहे. तुम्ही त्यांना 'शहरी नक्षलवादी' म्हणत असाल तर हे 'शहरी नक्षल' कोण आहेत, याची गृहमंत्र्यांनी चौकशी करावी. तुम्ही सामाजिक संघटनांचा अपमान केला आहे. ते विधानसभा निवडणुकीत बदला घेतील," असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा-

  1. देवेंद्र फडणवीस हा नतद्रष्ट माणूस; संजय राऊत यांचा घणाघात
  2. भारत जोडोच्या नावाखाली समाजात अराजकता पसरवण्याचं काम- देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.