सांगली Rahul Gandhi Maharashtra Visit : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याहस्ते कडेगाव येथे दिवंगत पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक पुतळयाचं उद्घाटन (Late Patangrao Kadam Statue Unveil Sangli) झालं. यावेळी राष्ट्रवादी - SP पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते रमेश चेंनीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज, विजय वडेट्टीवर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम उपस्थित होते.
हम यहां डॉ. पतंगराव कदम जी की याद में आए हैं। उन्होंने अपनी पूरी जिंदगी कांग्रेस, महाराष्ट्र और देश को दे दी।
— Congress (@INCIndia) September 5, 2024
कदम जी ने शिक्षा और विकास से जुड़े काम किए, साथ ही पूरी जिंदगी कांग्रेस के साथ खड़े रहे।
जब इंदिरा गांधी जी चुनाव हारी थीं, तब भी कदम जी उनके साथ खड़े थे।
: नेता… pic.twitter.com/4syhc21oYq
विश्वजीत कदम भावनिक : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याहस्ते कडेगाव येथे दिवंगत पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक पुतळ्याचं उद्घाटन झालं. यावेळी राहुल गांधी यांनी स्मारकस्थळी कदम कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी विश्वजीत यांच्या आई विजयामाला कदम यांची गळा भेट घेतली, यावेळी विश्वजीत कदम भावनिक झाले होते.
#WATCH | Maharashtra: Congress President Mallikarjun Kharge and Lok Sabha LoP & Congress MP Rahul Gandhi unveil the statue of Late Patangrao Kadam in Sangli. pic.twitter.com/85OljHp8eQ
— ANI (@ANI) September 5, 2024
पतंगराव कदम एकनिष्ठ : "डॉ पतंगराव कदम यांनी आपलं संपूर्ण आयुष्य काँग्रेस, महाराष्ट्र आणि देशासाठी दिलं. त्यांनी शिक्षण आणि विकासाशी संबंधित कामं केली आणि आयुष्यभर काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले. इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत झाल्या तेव्हाही पतंगराव कदम त्यांच्या पाठीशी उभे होते," असं म्हणत राहुल गांधी यांनी पतंगराव कदम यांच्या एकनिष्ठेची आठवण करुन दिली.
भाजपानं द्वेष पसरवला : "भाजपा देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवत आहे, ही काही नवीन गोष्ट नाही, शतकानुशतकं ते हे करत आले आहेत. त्यामुळं विचारधारांची ही लढाई जुनी आहे. आज ही लढत भाजपा आणि काँग्रेसमध्ये आहे. यापूर्वी हीच लढाई छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले यांनी लढली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर वाचाल तर तुम्हाला कळेल की या सर्वांची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा सारखीच आहे," असं म्हणत राहुल गांधींनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
चव्हाण कुटुंबीयांची भेट घेत केलं सांत्वन : नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचं नुकतंच निधन झालं होतं. राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. राहुल गांधी हे आज सकाळी नांदेडमध्ये दाखल झाले होते.
हेही वाचा-