ETV Bharat / state

पोक्सो गुन्ह्यात 10 वर्षाची शिक्षा झालेल्याच्या शिक्षेला स्थगिती, आरोपीला मिळाला जामीन - POCSO crime quashed - POCSO CRIME QUASHED

POCSO crime quashed : अल्पवयीन पीडितेवर बलात्कारासह इतर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात दोषी ठरवलेल्या आणि दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. संबंधित आरोपीचा सबळ वैद्यकीय आणि फॉरेन्सिक पुरावा नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आरोपीला दिलेल्या दहा वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

POCSO crime quashed
पोक्सो आरोपीला जामीन ((file Image Etv Bharat ))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 5:22 PM IST

मुंबई - POCSO crime quashed : अल्पवयीन पीडितेवर बलात्कार आणि इतर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात दोषी ठरवलेल्या आणि दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीला सबळ वैद्यकीय व फॉरेन्सिक पुरावा नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आरोपीच्या दहा वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देती जामीन मंजूर केला.

सत्र न्यायालयाने आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र आरोपीने त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करुन दाद मागितली. त्यामध्ये झालेल्या सुनावणीत, आरोपीविरोधात पुरेसा वैद्यकीय आणि फॉरेन्सिक पुरावा नसल्याने न्यायमूर्ती किशोर संत यांनी आरोपीला जामीन दिला. अल्पवयीन पीडितेवर बलात्कारासह लैंगिक अत्याचार केल्याचे उपलब्ध पुराव्यांमधून दिसून येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवले आहे.

2021 मध्ये आरोपीला पोक्सो (Protection of Children from Sexual Offenses Act ) अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती. 2021 मधील या प्रकरणात दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने 4 ऑक्टोबर 2023 रोजी आरोपीला दोषी ठरवत दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आरोपी विरोधात केमिकल अ‍ॅनालाझयरचा पुरावा नसल्याचा युक्तीवाद चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान केला होता. त्याची नोंद न्यायमूर्तींनी आपल्या निकालात घेतली आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मनिषा तिडके आणि पीडितेतर्फे अ‍ॅड. गौरी वेलणकर यांनी बाजू मांडली. पीडिता अल्पवयीन असल्याने तिच्या संमतीचा लाभ आरोपीला मिळू नये असा युक्तीवाद करण्यात आला. मात्र संमतीच्या मुद्दा विचारात घेत नसल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.

मुंबईतील गोरेगाव विभागातील हे प्रकरण आहे. न्यायालयाने आरोपीचे वकील अभिनव चंद्रचूड आणि शीतल म्हात्रे यांचे म्हणणे ऐकल्यानंतर हा निर्णय दिला. जामीनावर सुटका करताना आरोपीने गोरेगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत प्रवेश करु नये, असे निर्बंध त्याच्यावर लादण्यात आले आहेत.

हेही वाचा -

  1. झारखंडचे मंत्री मंत्री आलमगीर आलमचे ओएसडीसह नोकराला रांचीमध्ये अटक, ईडीचा छापा संपला - ED action in ranchi
  2. "वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्ज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा", कोणी केली मागणी? - Hemant Karkare assassination
  3. सोनं विकायला गेले अन् दोन भाऊ बेपत्ता झाले; मुंबईत सराफा व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा लावला 'चुना' - Gold Theft In Mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.