ETV Bharat / state

सांस्कृतिक राजधानी हादरली: चालत्या स्कूल बसमध्ये चालकाचा दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार - Man Sexually Assaults To Girls - MAN SEXUALLY ASSAULTS TO GIRLS

Man Sexually Assaults To Girls : चालत्या स्कूल बसमध्ये नराधम चालकानं दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बस चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना वानवडी परिसरातील एका नामांकित शाळेत उघडकीस आली.

Man Sexually Assaults To Girls
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 11:47 AM IST

Updated : Oct 3, 2024, 8:37 PM IST

पुणे Man Sexually Assaults To Girls : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरात मागच्याच आठवड्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना आता पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नामांकित शाळेतील 6 वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर चालत्या बसमध्ये चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. संजय जेटींग रेड्डी असं चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे.

स्कूल बस चालकाचा दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार : याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील वानवडी परिसरातील एका नामांकित शाळेमध्ये ने आण करण्यासाठी दोन मुलींना कुटुंबीयांना बस लावली. मागील काही दिवसांपासून व्हॅन चालक हा पीडित मुलींना पुढच्या बाजुला बसवून अश्लील चाळे करायचा. यातील तक्रारदार यांची मुलगी आणि तिच्या मैत्रीण 30 सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर घरी येत होत्या. यावेळी बस चालकानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती पीडितेनं तिच्या पालकांना दिल्यानं त्यांनी तत्काळ वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानं नराधम संजय जेटींग रेड्डी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन मुलींवर अत्याचार : चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी संजय रेड्डीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, नुकतच बदलापूर इथं दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचं प्रकरण देशभर गाजलं असताना आता पुन्हा पुण्यात दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानं खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिली माहिती : याबाबत पोलीस उपायुक्त आर. राजा म्हणाले की, "या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलींच्या आईंची तक्रार आहे. आरोपीनं पीडित मुलीच्या प्रायव्हेट पार्टला टच केल्याची तक्रार असून, या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली. याबाबत स्कूल बसमध्ये महिला मदतनीस होती का? याचा तपास आम्ही करत आहोत. स्कूल बस शाळेची होती की भाडेतत्त्वावर घेतलेली? याबाबत माहिती घेत आहोत. तसंच विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात नियमांचं उल्लंघन झालं का? याचा देखील आम्ही तपास सुरू असून, शाळा प्रशासनाशी संपर्क सुरू आहे. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल."

राज्य महिला आयोगाकडून दखल : याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "तत्काळ याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या वतीनं वानवडी पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी बातचीत करण्यात आली. त्यांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत. याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."

हेही वाचा :

  1. फार्मसीच्या विद्यार्थिनीला मित्रानं नेलं लॉजवर; तिघांनी केला सामूहिक बलात्कार, तेलंगाणात खळबळ - Gang Rape On Girl By Friends
  2. बीड हादरलं! वसतिगृहातून बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल - Minor Girl Molested
  3. तरुणानं लॉजवर नेऊन केला बलात्कार, हादरलेल्या पीडितेनं संपवलं जीवन; तर दुसऱ्या घटनेत नराधमानं दिव्यांग महिलेला केलं 'वासनेची शिकार' - Rape Victim Girl Commits Suicide

Last Updated : Oct 3, 2024, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.