ETV Bharat / state

...म्हणून पोर्शो कारला मिळाला नाही नोंदणी क्रमांक; आलिशान कार मालकाकडं 'ऐवढे' रुपये नाहीत - Pune Porsche Hit And Run Case

Pune Porsche Hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. या प्रकरणावरुन राजकारणही तापलं आहे. त्यामुळं हे प्रकरण देशभर गाजत आहे. करोडो रुपयांची कार अन् त्यांच्याकडं केवळ 1758 रुपये नाहीत का? जाणून घ्या, या प्रश्नाचं उत्तर या बातमीमथून....

Etv Bharat
पुणे हिट अँड रन प्रकरणातील कार (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 5:30 PM IST

Updated : May 21, 2024, 5:38 PM IST

पुणे Pune Porsche Hit And Run Case : पुणे शहरातील कल्याणी नगर येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात मंगळवारी पुणे पोलिसांकडून 'त्या' अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणाची आता देशभर चर्चा होऊ लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या आलिशान पोर्शो कारने दोन जणांचा जीव घेण्यात आला, त्या कारची आरटीओ कार्यालयात नोंदणीच झालेली नसून, नोंदणी न होताच ती गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर चालवली जात होती. तसंच धक्कादायक बाब म्हणजे, या आलिशान कारसाठी 1758 रूपये नोंदणी फी न भरल्यानं तिला नोंदणी क्रमांकही देण्यात आलं नसल्याचं यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं.

विना क्रमांक कार धावते रसत्यावर : पुण्यातील कल्याणी नगर येथे जो अपघात झाला आणि ज्या अल्पवयीन मुलानं दोन जणांना उडवत त्यांचं जीवन संपवलं, त्या आलिशान कारला दोन्ही बाजूस नंबर नव्हते. आता त्याबाबत माहिती घेतली असता, ती कार नोंदणीच झालेली नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, ही कार मुंबईतील शोरूममधून पुण्यात आणली होती. गेल्या दोन महिन्यांपासून ही कार पुण्यातील रस्त्यावर विना नंबर प्लेट धावत असल्याचं सांगितलं जात आहे.

का नाही मिळाला नोंदणी क्रमांक? : याबाबत पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की, "कल्याणी नगर येथील अपघातात जी पोर्शो कार होती तिला तात्पुरता नोंदणी क्रमांक हा प्रादेशिक कार्यालय बंगळुरु, कर्नाटक यांनी जारी केला आहे. हा क्रमांक 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 असा 6 महिन्यांसाठी वैद्य होता. तात्पुरता नोंदणी क्रमांक जारी केल्यावर नोंदणी करण्याची जबाबदारी ही संबंधित वाहन मालकाची असून, वाहन मालकाने 18 एप्रिल रोजी वाहन तपासणीसाठी ते आरटीओ कार्यालयात पाठवलं देखील होतं. तपासणी झाल्यानंतर येथील अधिकाऱ्यांनी त्याचं अप्रुव्हल देखील दिलं होतं. तसेच या वाहनाची प्रिस्काईप फी 1758 रूपये वाहन मालकानं न भरल्यामुळं वाहन प्रणालीवर त्याचा नोंदणी क्रमांक जारी झालेला नाही. आजतागायत या वाहन मालकानं ती 1758 रुपये फी भरलेली नाही. तसेच हे इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळे या वाहनाला राज्यात कर माफी आहे. पण वाहन मालक यांनी अप्रुव्हल फी न भरल्याने त्यांना नोंदणी क्रमांक देण्यात आला नाही. "

संबंधित पबवर कारवाई : पुणे शहरातील कल्याणी नगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं 'त्या' दोन पबवर कारवाई करण्यात आली. तसेच दोन्ही पब बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. तसंच नियम उल्लंघन करणाऱ्या इतर आस्थापनांवर देखील कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत. अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं नोंदवलेल्या नियम उल्लंघनाच्या प्रकरणात हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल/ परमिट रूम/पब आस्थापनांचे व्यवहार तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

हेही वाचा -

  1. पुणे हिट अँड रन प्रकरण : पोर्शो कार नोंदणी न करताच रस्त्यावर, 40 लाखांचा टॅक्स नुसता भरणं आहे बाकी - Pune Hit and Run Case
  2. पुण्यातील अपघातावरून तापलं राजकारण, न्यायालयीन चौकशी करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी - Pune hit and run case
  3. कल्याणीनगर अपघातात प्रकरणात आरोपीला अटक, सोसायट्यांमधून बार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप - Pune accident news

Last Updated : May 21, 2024, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.