पुणे Pune Murder News : पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक उघडकीस आलीय. लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका 22 वर्षीय तरुणीचं तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केलं. त्यानंतर पैसे मिळाल्यानंतरही तरुणी घरी आपलं नाव सांगेल या भीतीनं तिचा खून केल्याचं समोर आलीय.
मृत तरुणीच्या वडिलांनी पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात 30 मार्च रोजी अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. यानुसार पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आलीय. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केलीय.
नऊ लाख रुपये खंडणीची मागणी : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची लातूरची असलेली तरुणी पुण्यातील वाघोली परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 30 मार्चच्या रात्री नऊच्या सुमारास ती विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाली होती. मुलीसोबत संपर्क होत नसल्यानं तिच्या आई-वडिलांनी पुणे गाठून पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याच कालावधीत तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेजही आला. नऊ लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला मारुन टाकू अशी धमकी त्यात देण्यात आली होती. घाबरलेल्या वडिलांनी पैसेदेखील दिले. मात्र मुलगी परत आली नाही.
खून करुन शेतात पुरला मृतदेह : यातील मुख्य आरोपी शिवम हा मृत तरुणीचा मित्र आहे. त्यांनी एका ॲपवरुन गाडी भाडयानं घेतली होती. 30 मार्चच्या रात्री आरोपींनी तरुणीचं अपहरण करून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरुन टाकला होता. याबाबत परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितलं की, "आरोपीनं पुरावा नष्ट करण्यासाठी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरुन टाकला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरुन तिच्या कुटुंबीयाकडे 9 लाखांची खंडणीदेखील मागितली. पैसे दिल्यावर देखील जर मैत्रिणीला परत पाठवलं तर ती नाव सांगेन म्हणून तिघांनी तिचा खून केला. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केला. तीन आरोपींना अटक केल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा :