ETV Bharat / state

पुणे मेट्रोची ऐतिहासिक कामगिरी, मुठा नदीखालून यशस्वी चाचणी - पुणे मेट्रो

Pune Metro : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानकापर्यंतची चाचणी यशस्वी पूर्ण झाली आहे. मुठा नदी पात्राच्या खालून बनवण्यात आलेल्या टनेलमधून ही चाचणी करण्यात आली. आता लवकरच हा मार्ग प्रवासासाठी खुला होणार आहे.

Pune Metro
Pune Metro
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 6:55 AM IST

पुणे Pune Metro : पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गावर चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ही चाचणी झाली. सिव्हिल कोर्ट स्थानकावरून सकाळी 10:58 वाजता निघालेली मेट्रो 11:59 वाजता स्वारगेट स्थानकावर पोहचली. या दरम्यान मेट्रोचा वेग ताशी 7.5 किमी इतका होता. एकूण 3.64 किमी मार्गावर ही चाचणी घेण्यात आली आहे.

मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो : या मार्गाची खास बाब म्हणजे, हा मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो. नदीच्या खालून मेट्रो जाणं ही पुणे शहरासाठी अभिमानाची बाब आहे. सिव्हिल कोर्ट स्थानक 33.1 मीटर खोल तर बुधवार पेठ स्थानक 30 मीटर खोल आहे. मंडई हे स्थानक 26 मीटर खोल आणि स्वारगेट स्थानक 29 मीटर खोल आहे. पुणे मेट्रो प्रकल्पामधील भुयारी मार्गाचं खोदकाम काम 28 सप्टेंबर 2020 ला सुरू करण्यात आलं होतं. 4 जून 2022 पर्यंत एकूण 12 किमी भुयारी मार्गाचं खोदकाम पूर्ण झालं होतं.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट थेट प्रवास शक्य : यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले की, "सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक मार्गावरील मेट्रो चाचणी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरासाठी ऐतिहासिक घटना आहे. हे मार्ग भूमिगत असून ते मुठा नदीच्या खालून जातात. याद्वारे येत्या काही महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक असा थेट प्रवास करणं शक्य होईल. काही दिवसात हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होऊ शकेल."

हे वाचलंत का :

  1. बहुचर्चित नवी मुंबई मेट्रो अखेर सुरू; कोणत्या भागातील प्रवाशांना होणार फायदा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.