ETV Bharat / state

पुण्यातील अपघातावरून तापलं राजकारण, न्यायालयीन चौकशी करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी - Pune hit and run case

पुण्यात झालेल्या भीषण अपघातानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं निलंबन करण्याची मागणी केली आहे.

पुणे अपघात
Pune hit and run case (Source- ETV Bharat DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 12:30 PM IST

Updated : May 21, 2024, 12:56 PM IST

मुंबई- पुण्यात झालेल्या भीषण अपघातात पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत अपघाताच्या चौकशीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. दुसरीकडं अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचं सीसीटिव्ही फुटेज समोर आले. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र असल्याचं विरोधी पक्षनेत्यानं म्हटलं आहे. आरोपी अल्पवयीन आहे. हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करत घटनेची न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणी केली. या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

पोलीस आयुक्तांना हटवावे-पुणे कार अपघातावर शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत म्हणाले, " पुणे पोलिस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे. त्यांनी आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. एका तरुण जोडप्याचा मृत्यू झाला. मात्र, अल्पवयीन आरोपीला 2 तासांत जामीन मंजूर झाला. व्हिडिओमध्ये अल्पवयीन आरोपी नशेत असल्याचं दिसून आलं आहे. पण त्याचा मेडीकल रिपोर्ट निगेटिव्ह आला. हे पोलीस आयुक्त कोण आहेत? त्यांना हटवावे की आम्ही रस्त्यावर उतरावे?

पोलीस तपासात दबाव टाकला नसल्याचा आमदार टिंगरेंचा दावा- पुणे अपघातात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार सुनिल टिंगरे यांनी पुणे पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप होत आहे. यावर आमदार सुनिल टिंगरे यांनी सोमवारी रात्री एक्स मीडियावर पोस्ट करत हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती पहाटे ३ च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसंच माझे परिचित बिल्डरनंही फोन केला. त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि येरवडा पोलीस ठाण्यात गेलो. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही, हे पोलीस अधिकारीही कबूल करतील, यात शंका नाही.

पुढे आमदार टिंगरे यांनी पोस्टमध्ये म्हटले, " ‘नाईट लाईफ’च्या विरोधात असून वेळोवेळी आवाजही उठवला आहे. विमाननगर, कल्याणीनगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरु असलेले पब, बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारु विक्री, मटका धंदा, हुक्का पार्लर, पत्त्याचे क्लब, अमली पदार्थांची विक्री, मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्तांना यापूर्वी पत्रही दिलं आहे. तसेच विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवला आहे. परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे."

हेही वाचा-

  1. कल्याणीनगर अपघातात प्रकरणात आरोपीला अटक, सोसायट्यांमधून बार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप - Pune accident news
  2. पुणे हिट अँड रन प्रकरणी हॉटेल मालक, मॅनेजर आणि वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल - Pune Hit And Run Case

Last Updated : May 21, 2024, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.