ETV Bharat / state

'पुढच्या वर्षी लवकर या'... पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं रात्री आठच्या आत विसर्जन, पाहा व्हिडिओ - Pune Ganpati Visarjan 2024 - PUNE GANPATI VISARJAN 2024

Pune Ganpati Visarjan 2024 : 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर आज पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन (Five Manache Ganpati) करण्यात आलं. गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या गणेशभक्तांचे डोळे पाणावले होते. तर पुण्यात सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

Pune Ganpati Visarjan 2024
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 10:34 PM IST

पुणे Pune Ganpati Visarjan 2024 : 'गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...' असं म्हणत ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात आणि उत्साहात आनंदात पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला वाजत गाजत सुरूवात झाली होती. पुण्याची मुख्य मिरवणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, आणि मानाचा पहिला 'श्री कसबा गणपती' बाप्पाची आरती करून करण्यात आली. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मानाच्या पाचही गणपती (Five Manache Ganpati) मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला यंदाच्या वर्षी 10 तासाहून अधिक वेळ लागला.

मानाचा पहिला गणपती : मानाचा पहिला 'श्री कसबा गणपती' मंडळाची श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली होती. मिरवणुकीमध्ये गायकवाड बंधूंचे सनई वादन आणि देवलकर बंधूचे चौघडा वादन, नगारखाना, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडियाचे पथक सहभागी होते. रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथक आणि परशुराम ढोल-ताशा पथकांकडून वादन करण्यात आले. सकाळी 10 वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक ही ठीक 4 वाजून 35 मिनिटांपर्यंत चालली आणि कसबा गणपतीचं विसर्जन पतंगा विसर्जन घाटावर करण्यात आलं. जवळपास 6 तास मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला लागला.

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन (ETV BHARAT Reporter)

मानाचा दुसरा गणपती : मानाचा दुसरा 'तांबडी जोगेश्वरी गणपती' मंडळाची श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली. पारंपरिक पोशाखात कार्यकर्ते सहभागी झाले होते. सतीश आढाव यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँन्ड, समर्थ प्रतिष्ठान, ताल, शिवमुद्रा ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर विष्णूनादचे कार्यकर्ते पालखी पुढे शंख नाद करत होते. यंदा शिवराज्याभिषेक रथमध्ये ठिकठिकाणी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असताना पाहायला मिळाले, तर ठीक 5 वाजून 10 मिनिटांनी गणपतीचं विसर्जन झालं.

मानाचा तिसरा गणपती : गुरुजी तालीम मंडळात स्वप्निल आणि सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या आकर्षक फुलांच्या सूर्यरथात रथात श्रींची मूर्ती विराजमान झाली होती. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँन्डकडून वादन तर नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा (फुलगांव) प्रात्यक्षिके सादर करण्यात आलं. तर नादब्रह्म, नादब्रह्म ट्रस्ट, गर्जना ढोलताशा पथके वादन करण्यात आले. यंदा विशेष बाब म्हणजे राज्यात प्रथमच सुरू झालेलं तृतीय पंथीयांचे शिखंडी पथकानं आपलं वादन देखील केलं. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाचा वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाकडून विसर्जन मिरवणूक मार्गावर गुलालची उधळण करण्यात आली होती. ठीक 6 वाजून 44 मिनिटांनी मनाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.

मानाचा चौथा गणपती : तुळशीबाग गणपती मंडळाची श्रींची मिरवणूक जगन्नाथ पूरी रथातून काढण्यात आली होती. मिरवणुकीत लोणकर बंधूंचा नगारा, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, ही ढोलताशा पथक सहभागी झाले होते. स्वरूपवर्धिनीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली, तर ठीक 7 वाजून 15 मिनिटांनी मानाचा चौथा-तुळशीबाग गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.

मानाचा पाचवा गणपती : केसरीवाडा येथील गणपतीला पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हटले जाते. केसरीवाड्याचा गणपती मंडळाची रथातून मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीत बिडवे बंधूंच्या नगारा, शिवमुद्रा, श्रीराम आणि आवर्तन ढोल-ताशा पथके वादन करण्यात आले. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला माऊली रथ मिरवणूकीचे आकर्षण होते. तर यंदा विशेष बाब म्हणजे इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषेत होते. ठीक 7 वाजून 37 मिनिटांनी मानाच पाचव श्री केसरी गणपती मंडळाच्या बाप्पाच विसर्जन करण्यात आलं.

हेही वाचा -

  1. पारंपरिक वेशभूषा, ढोल पथकांच्या जल्लोषात पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात - Pune Ganapati Visarjan
  2. उपराजधानीत गणेश विसर्जनाची धूम, 'नागपूरच्या राजा'ला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी - Nagpur Ganesh Visarjan
  3. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप!, मुंबईच्या राजाची जल्लोषात विसर्जन मिरवणूक, पाहा व्हिडिओ - Mumbai Ganpati Visarjan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.