ETV Bharat / state

चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट, एक किलोमीटरपर्यंत हादरे बसले! - Gas Tanker Explosion

Gas tanker explosion in Pune : पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटामुळं नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.

pune news gas tanker explosion on chakan shikrapur road
चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 9:22 AM IST

Updated : May 19, 2024, 10:33 AM IST

चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट (reporter)

पुणे Gas tanker explosion in Pune : पुण्यातील चाकण -शिक्रापूर मार्गावर गॅसच्या कंटेनरमधून गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय. ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक असे तीन ते चार स्फोट झाले. ही घटना शेल पिंपळगावमध्ये आज (19 मे) पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

स्फोटाचे हादरे एक किलोमीटरपर्यंत बसले : मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोहितेवाडी परिसरात ढाबा (हॉटेल) आहे. या ढाब्यावर नेहमीच गर्दी असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर एक गॅस टँकर उभा होता. अचानक या टँकरला आग लागली. क्षणार्धात आगीनं रौद्ररुप धारण केलं. गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे जवळपास एक किलोमीटरपर्यंत बसले. स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिक घाबरल्याचं बघायला मिळालं.

आग नियंत्रणात आणण्यात यश : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्यात आलीय. तसंच टँकरमधून गॅस गळती झाल्यानं आग लागून हा स्फोट झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरणं निर्माण झालंय.

घटनेचा पुढील तपास सुरू : गॅसच्या स्फोटानं महामार्गालगत असलेल्या अनेक घरांच्या काचा फुटल्या. तसंच काही घरांची पडझड देखील झाली. मात्र, सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेतील आरोपी तसंच शेल पिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. या घटनेचा पुढील तपास आता चाकण पोलीस करत आहेत.

टँकर चालक आणि इतर आरोपी फरार- पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास गॅस रिफिलिंग करणाऱ्या टँकरमधून हा ब्लॉक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेत काही सिलेंडरचे स्फोट झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जागा मालकाला ताब्यात घेतले. टँकर चालक आणि इतर आरोपी फरार झाले आहेत. या घटनेसंबंधी कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा -

  1. सिलेंडर स्फोटानं नागरिक हादरले; चिमुकलीचा मृत्यू, तर पाच जण जखमी - Girl Died In Cylinder Blast
  2. Gelatin Explosion Satara : साताऱ्यातील परळी वन परिमंडळ कार्यालयात जिलेटिनचा भीषण स्फोट; वन विभागात खळबळ
  3. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची कारवाई, बल्लारी मध्यवर्ती कारागृहातून संशयित दहशतवाद्याला घेतलं ताब्यात

Last Updated : May 19, 2024, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.