ETV Bharat / state

येरवडा कारागृह ते आंतरराष्ट्रीय तस्करी; पुणे ड्रग्स प्रकरणाचा प्रवास - अमितेश कुमार

Pune Drugs : राज्यभर गाजत असलेल्या पुणे ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केलीय. तसंच पुणे, दिल्ली आणि सांगली इथं कारवाई करत सुमारे तीन ते साडेतीन हजार कोटींचं साडेसतराशे किलो एमडी ड्रग्ज जप्त केलंय.

Pune Drugs
Pune Drugs
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 11:56 AM IST

पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे Pune Drugs : पुणे ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, सांगली इथं कारवाई करत तब्बल साडे सतराशे किलो एमडी ड्रग्ज जप्त केलंय. याची किंमत जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपये आहे. या ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवर असून आतापर्यंत यात 8 जणांना अटक केली असून, हे सर्व आरोपी एकेकाळी येरवडा जेलमध्ये एकत्र होते आणि तिथून त्यांची ही टोळी तयार झाली असून, त्यांचा येरवडा ते लंडन असा प्रवास हा समोर आलाय. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पुणे ड्रग्ज प्रकरणात वैभव उर्फ पिंटया भारत माने, अजय आमरनाथ करोसिया, हैदर नुर शेख, भिमाजी परशुराम साबळे, युवराज बब्रुवान भुजबळ, दिवेश चिरंजीत भुटिया, संदिप राजपाल कुमार यांना अटक करण्यात आलीय. तर पुणे पोलिसांनी दिल्लीतून 3 आरोपींना अटक केली होती. या तीन आरोपींना घेऊन पुणे पोलीस विमानाने पुण्यात दाखल झाले आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी परदेशी नागरिक : याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य आरोपी परदेशी नागरिक असून, तो आता विदेशात फरार झालाय. हा विदेशी नागरिक पूर्वी पुण्यात एका प्रकरणात आरोपी होता आणि तो येरवडा जेलमध्ये होता. तेव्हा त्याची यातील अटक झालेल्या आरोपींशी ओळख झाली होती. तिथून ही तयार झालेली टोळी बाहेर आल्यावर ड्रग्ज बाबत विविध कामं करु लागली. आरोपींच्या पूर्वीच्या आणि आताच्या प्रकरणाचं काय संबंध आहे, याचा देखील आम्ही शोध घेत आहोत."

आरोपींचा शोध घेण्यासाठी 7 ते 8 देशांत पथकं : या ड्रग्ज बाबत दिल्ली, सांगली आणि पुण्यातील कुरकुंभ येथील कारवाई संपली असून, दिल्ली येथील आरोपींना आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. आज दिल्लीत अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुण्यात आणून त्यांचा पुढील तपास करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणात काही आरोपी हे देशासह देशाबाहेर फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी 7 ते 8 देशात पथकं पाठविण्यात आले आहेत. ड्रग्ज प्रकरणात जी सप्लाय चैन होती, यात काही होलसेल तर काही रिटेल चैन होती. पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत होलसेल चैनवर जास्त लक्ष होत. तर आत्ता यापुढं रिटेल चैन वर देखील कारवाई करण्यात येणार असून यासाठी 15 ते 20 पथकं तयार करण्यात आली असल्याचं यावेळी अमितेश कुमार यांनी सांगितलं. तसंच दिल्ली, सांगली इथं कारवाई करत तब्बल 1700 ते 1800 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं असल्याची माहिती यावेळी अमितेश कुमार यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. ड्रग्ज तस्करीत लंबा बाल, मुंबई का बंदर अन् नमक पार्सल; डोक्याचा भुगा करणारी तस्करांची नावं झाली उघड
  2. महाराष्ट्रात चाललंय काय? कोट्यवधींच्या ड्रग्जनंतर आता सोलापुरात तब्बल 459 किलो गांजा जप्त
  3. मिठाच्या पिशव्यातून ड्रग्जची तस्करी; सांगलीत 300 कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.