सेंच्युरियन SA vs PAK 1st Test Day 4 Live : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु झाला आहे. आज या सामन्याचा चौथा दिवस आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी यजमान आफ्रिकेला 121 धावांची गरज आहे त्यांच्या 7 विकेट शिल्लक आहेत तर पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 7 विकेटची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे पाकिस्ताननं आफ्रिकन भूमिवर जानेवारी 2007 मध्ये शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. त्यामुळं त्यांना 18 वर्षांनंतर आफ्रिकन भूमीवर कसोटी सामना जिंकण्याची संधी आहे.
Day 3 | Stumps 🟢⚪️
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 28, 2024
Test match cricket never fails to entertain, as day three comes to a close🏏
🇵🇰Pakistan: 211/10 (1st Innings)
🇿🇦South Africa: 301/10 (1st Innings)
🇵🇰Pakistan: 237/10 (2nd Innings)
🇿🇦South Africa: 27/3 (2nd Innings)
The Proteas need 121 more runs to win in… pic.twitter.com/GNUeaSuAUm
आफ्रिकेला विजयासाठी 121 धावांची गरज : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेनं 9 षटकांत 3 गडी गमावून 27 धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाला विजयासाठी अद्याप 121 धावांची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी सध्या एडन मार्कराम 25 चेंडूत 22 धावांवर नाबाद आहे आणि कर्णधार टेंबा बावुमा 1 चेंडूत 0 धावांवर नाबाद आहे. याशिवाय तिसऱ्या दिवशी टोनी डी झॉर्झी 2 धावा करुन बाद झाला, तर ट्रिस्टन स्टब्स 1 धावा करुन बाद झाला. दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद अब्बासनं 2 बळी घेतले. तर खुर्रम शहजादला 1 विकेट मिळाली.
It’s Jansen’s World🌍
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 28, 2024
Marco Jansen tore into the Pakistan batsmen after being brought into the attack!🔥
Adding another fiver to his career stats as well.👏🏏#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/O1dEczJPTe
पाकिस्तानच्या 259 धावा : तिसऱ्या दिवशी पाकिस्ताननं दुसऱ्या डावात 59.4 षटकात 259 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात सौद शकीलनं सर्वाधिक 84 धावा केल्या. सौद शकीलशिवाय बाबर आझमनं 50 आणि शान मसूदनं 28 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅनसेननं दुसऱ्या डावात सर्वाधिक 6 बळी घेतले. तर कागिसो रबाडाला 2, कॉर्बिन बॉशला 1 विकेट आणि डॅन पॅटरसनला 1 विकेट मिळाली.
Pacers bag early wickets as Pakistan set the stage for a thrilling finish in Centurion 🙌#SAvPAK 📝: https://t.co/fOyfJCu40b | #WTC25 pic.twitter.com/FgOoAN6MIR
— ICC (@ICC) December 28, 2024
WTC फायनलसाठी आफ्रिकेला एका विजयाची गरज : WTC गुणतलिकेत दक्षिण आफ्रिका सध्या अव्वल स्थानावर आहे. त्यामुळं त्यांना WTC फायनलसाठी केवळ एका विजयाची गरज आहे. मात्र पाकिस्ताननं विजय मिळवल्यास भारताचा फायदा होऊ शकतो. कारण भारत सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. जर हा सामना पाकिस्ताननं जिंकला तर दक्षिण आफ्रिकेची टक्केवारी कमी होईल मात्र सोबतच भारतलाही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ कधी सुरु होणार?
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ रविवार 29 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 01:30 वाजता सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क इथं खेळवला जाईल.
End of the third day's play: Pakistan set South Africa a target of 148 after scoring 237 in second innings. South Africa close day three at 27/3 in 9 overs. 🏏#SAvPAK pic.twitter.com/bEZMw2qtuP
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 28, 2024
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ कुठं आणि कसा बघायचा?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 एसडी आणि स्पोर्ट्स 18-1 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. तसंच या सामन्याचं जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 :
दक्षिण आफ्रिका : टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टिरक्षक), मार्को जेन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन.
पाकिस्तान : शान मसूद (कर्णधार), सईम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, सलमान आगा, आमेर जमाल, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास
हेही वाचा :