ETV Bharat / state

नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ, शिंदे, पवार, शाहंचीही होणार जाहीर सभा - Lok Sabha Elections 2024 - LOK SABHA ELECTIONS 2024

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी नाशिक गोल्फ क्लब मैदानावर उद्धव ठाकरे, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या मैदानावर आजवर अनेक दिग्गज नेत्यांनी सभा गाजवल्या आहेत.

Lok Sabha Elections
Lok Sabha Elections
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 10:59 PM IST

नाशिक Lok Sabha Elections : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. महायुतीसह, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांनी नाशिकचं गोल्फ क्लब मैदान गाजणार आहे. या मैदानात 15 ते 18 मे रोजी सभा होणार आहे. 15 मे रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. त्यानंत 16 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 17 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, 18 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं आयोजन गोल्फ क्लब मैदान करण्यात आलंय.

गोल्फ क्लब मैदानाला पसंती : नाशिकमधील लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन महिने वेळ असला, तरी राजकीय पक्षांकडून पूर्व तयारी केली जात आहे. महायुतीसह, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांसाठी विशेषतः गोल्फ क्लब मैदानाला पसंती मिळत आहे. राजकीय पक्षांनी आतापासूनच या मैदानाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केलीय. नेत्यांच्या जाहीर सभांसाठी मैदान मिळावं, यासाठी महानगरपालिकेच्या जाहिरात विभागाकडं अर्ज सादर करण्यात येत आहे.

अशी मिळते परवानगी : यंदाची निवडणूक बघता शहरात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सभा, मेळाव्यांसाठी शहरातील मैदानं उपलब्ध व्हावी, म्हणून महानगरपालिकेच्या जाहिरात विभागाकडून ना हरकत दाखला दिला जातो. या दाखल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडं परवानगीसाठी सादर केला जातो. त्यानंतर सभेला परवानगी दिली जाते, अशी माहिती महानगरपालिकेच्या जाहिरात विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.

गोल्फ क्लब मैदान इतिहास : नाशिकमधील थंड हवामान यामुळं ब्रिटिशांनी नाशिकला गोल्फ खेळण्यासाठी नाशिकची निवड केली होती. त्या काळात आशियातील सर्वात मोठं नाशिकचं गोल्फ मैदान होतं. यानंतर 1997 मध्ये शिवसेनेचे पहिले महापौर वसंत गीते यांच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची याच नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर भव्य सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी हे गोल्फ क्लब मैदान नसून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नाशिक महापालिकेनं या मैदानाचं नामाकरण हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान केलं. आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा या मैदानावर गाजल्या आहेत.

हे वाचलंत का :

  1. नारायण राणेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्याचे दिले संकेत; उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका - Narayan Rane Press Conference
  2. अमरावतीत आंबेडकर बंधुची खेळी; 'वंचित'चा आनंदराज यांना बिनशर्त पाठिंबा - LOK SABHA ELECTIONS
  3. भाजपावर मित्रपक्ष संपवण्याचा आरोप, लोकसभा निवडणुकीत बसणार महायुतीला फटका? - Lok Sabha Elections 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.