ETV Bharat / state

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पालघरमध्ये निषेध; खासदार सवरा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने - Protest against Rahul Gandhi - PROTEST AGAINST RAHUL GANDHI

Protest against Rahul Gandhi - राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पालघरमध्ये निषेध करण्यात आला. खासदार सवरा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. आरक्षणविरोधी पक्षांना सत्तेत येऊ न देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पालघरमध्ये निषेध
राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पालघरमध्ये निषेध (ईटीव्ही भारत बातमीदार)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 6:41 PM IST

पालघर Protest against Rahul Gandhi - लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारत विरोधी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने विक्रमगड येथील छत्रपती शिवाजी चौकात निषेध करण्यात आला. खा. डॉ. हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली यावेळी आंदोलन करण्यात आलं. अमेरिकेने रशियाची शकले केली. रशियानंतर भारत हा जगातील मोठी शक्ती असून, तिला भारताची शकले करायची आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या या कूट कारस्थानाला हातभार लावण्याचं काम केलं, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा - यावेळी खा. सवरा यांनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचं काम कार्यकर्त्यांनी करावं, असं आवाहन केलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६१ मध्ये देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण रद्द करण्यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या पत्राचा संदर्भ देऊन डॉ. सवरा यांनी पंडित नेहरू यांचा हा विचार विरोधामुळे कसा रद्द करावा लागला, हे सांगितलं. पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत काँग्रेसचे सर्वच नेते कसे आरक्षण विरोधी आहेत आणि त्यांची नाटक कंपनी देशात एक आणि परदेशात वेगळेच नाटक कसे करत आहे, हे सांगून जनतेला आता काँग्रेसचा खरा चेहरा सांगितला पाहिजे, असं ते म्हणाले.

संविधान डोक्यावर घेणाऱ्यांचे ढोंग उघडे - राहुल गांधी लोकसभेत येताना संविधान डोक्यावर घेऊन येतात आणि लोकसभेच्या निवडणुकीत आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कसे वचनबद्ध आहोत असे सांगतात. हे त्यांचे ढोंग अमेरिकेतील त्यांच्या वक्तव्याने उघडे पाडले आहे. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ आणि २०१९मध्ये प्रचंड बहुमत असतानाही आरक्षणाला कसा धक्का लागू दिला नाही, याचा उल्लेख करून खा. सवरा म्हणाले की, मोदी यांनी स्वतःच लोकसभेत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी पुन्हा अवतरले, तरी आरक्षण बदलू शकत नाहीत, एवढे आरक्षण भक्कम आहे.

विधानसभेत आरक्षणविरोधकांची सत्ता येऊ देणार नाही - भारतात किंवा महाराष्ट्रात काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांची सत्ता येऊ द्यायची नसेल, तर त्या विरोधात जनजागृती करावी लागेल. जनतेला विश्वासात घ्यावे लागेल आणि आरक्षण संपवण्यास निघालेल्या या पक्षांना घरी बसवावे लागेल, असा इशारा डॉ. सवरा यांनी दिला. काँग्रेसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून त्यांचा मुखवटा टराटरा पाडून आरक्षणाला विरोध करणाऱ्या या पक्षाला धडा शिकवला पाहिजे, असा ठाम निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता घरोघर जाऊन काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा कसा आहे, हे जनतेला पटवून द्यावे आणि आरक्षण विरोधक आता सत्तेत नको, अशी मानसिकता जनतेची तयार करायला हवी. अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण रद्द करायला निघालेल्या या काँग्रेसला आता कधीच सत्तेत येणार नाहीत, अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा..

  1. पुण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
  2. आरक्षण रद्द करण्याचं कथित वक्तव्य; राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपा आक्रमक, आज राज्यभर आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.