ETV Bharat / state

पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ; मनोरमा खेडकर यांच्या कंपनीला महानगरपालिकेनं ठोकलं टाळं, काय आहे प्रकरण? - IAS Pooja Khedkar

Manorama Khedkar Company Sealed : मागच्या दोन आठवड्यांपासून पूजा खेडकर हे प्रकरण राज्यासह देशभरात गाजतंय. बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचं प्रकरण पुढं आल्यानं त्यांची चौकशी होत आहे. त्यामुळं त्यांचा प्रशिक्षण कालावधी थांबवण्यात आलाय. आता पिंपरी चिंचवड महापालिकेनंही त्यांच्याशी संबंधित कंपनीला टाळं ठोकलंय. त्यामुळं पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ झालीय.

Pooja khedkar Mother Manorama Khedkar company Sealed by Pimpri Chinchwad Municipal Corporation
मनोरमा खेडकर यांच्या कंपनीला महानगरपालिकेनं ठोकलं टाळं (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 9:21 AM IST

Updated : Jul 20, 2024, 9:57 AM IST

पुणे Manorama Khedkar Company Sealed : तळवडे येथील खेडकर कुटुंबाशी संबंधित असलेली आणि महापालिकेचा कर थकवल्याबद्दल वादग्रस्त कंपनी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडला महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीनं शुक्रवारी टाळं ठाेकण्यात आलंय. दरम्यान, या कंपनी संचालकाकडं महानगरपालिकेची दोन लाख 77 हजार रुपयांची कराची थकबाकी असल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.

पूजा खेडकर यांनी दिला होता या कंपनीचा पत्ता : वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र काढलं, त्यावेळी या कंपनाीचा पत्ता आपला रहिवासाचं ठिकाण म्हणून दिला. त्यामुळे पिंपरी चिंचवड इथली थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रकाशझोतात आली. याबाबत माध्यमातून बातम्या प्रसारित होताच, महापालिकेनं या कंपनीवर कर थकवल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारला.

मनोरमा दिलीप खेडकर यांच्या नावानं आहे कंपनी : तळवडे गावठाण, ज्याेतिबानगर इथं थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. ही कंपनी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळं कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. सदरील कंपनी मनोरमा दिलीप खेडकर यांच्या नावे असून महापालिकेनं यासंदर्भातील सर्व कागदपत्रं तपासली आहेत.

नोटीसमध्ये काय लिहिलंय? : कंपनीला टाळं ठोकण्यात आलं असून नोटीसमध्ये म्हटलंय की, "सदरची मिळकत महानगरपालिकेनं जप्त केली असून त्यास सील केलेलं आहे. बेकायदेशीरपणे सदरचे केलेले सील तोडून या मिळकतीमध्ये कुणीही प्रवेश केल्यास त्याच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल याची स्पष्ठ नोंद घ्यावी."

काय आहे प्रकरण? : कंपनीमार्फत 2009 पासून व्यावसायिक कर भरला जात होता. शेवटचा कर 2022 मध्ये भरण्यात आला. त्यानंतर कंपनीनं कर भरला नाही. सध्याला कंपनीनं दोन लाख 77 हजार 781 रुपयांचा कर थकवलाय. त्यामुळं नियमानुसार मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आलीय. ही कारवाई महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीनं करण्यात आली. कारवाईवेळी प्रशासकीय अधिकारी नाना माेरे, एल एम काळे संबंधित गटलिपिक, एमएसएफ जवान उपस्थित हाेते.

हेही वाचा -

  1. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल - Pooja Khedkar
  2. पूजा खेडकर यांना यूपीएससीचा दणका : खोटं प्रमाणपत्र प्रकरणी दाखल केला खटला, बजावली कारणं दाखवा नोटीस - UPSC Issue Notice To Pooja Khedkar
  3. पूजा खेडकर यांच्याविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक; दमदाटी केल्याचा आरोप, "कारवाई करा अन्यथा..." - IAS Pooja Khedkar Controversy

Last Updated : Jul 20, 2024, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.