मुंबई- काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी आज शिर्डी दौऱ्यावर असून, दौऱ्यादरम्यान प्रियंका गांधींनी शिर्डीत येऊन साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलंय. काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी आज राज्यातील अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या शिर्डीतून झालीय. प्रियंका गांधी यांनी आज साईबाबांच्या दुपारचा मध्यान्ह आरतीनंतर शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलंय. प्रियंका गांधींनी साईबाबांच्या द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असून, साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरात उपस्थिती असलेल्या भाविकांना गांधींनी अभिवादन केलंय. साई दर्शनानंतर प्रियंका गांधी राहाता येथील सभेकडे रवाना झालेत.
प्रियंका गांधींच्या विमान उड्डाणास उशीर : प्रियंका गांधींनी प्रथमच शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतलंय. या अगोदर सोनिया गांधी, राहुल गांधी, साईबाबा समाधीचे निवडणूक काळातच साईदर्शन घेतलं होतं. दिल्ली परिसरात धुके असल्याने प्रियंका गांधी यांचे विमान उड्डाणास उशीर झाल्याने शिर्डी येथे 4 तास उशिराने सभास्थानी पोहोचल्यात. अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची शिर्डी जवळील राहाता येथे जाहीर सभा झालीय. काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी यांनी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर नगर-मनमाड हायवे राहाता येथील दौलतबाग येथे महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतलीय. या सभेनंतर प्रियंका गांधी कोल्हापूर येथील सभेसाठी रवाना झाल्यात.
जर्मन हँगर पद्धतीचा मंडप : विशेष म्हणजे या सभेसाठी भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले असून, जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला होता. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, पार्किंग आणि विविध कक्ष निर्माण करण्यात आली होती. या सर्व तयारीची पाहणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली होती. या सभेसाठी उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातून नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने आल्या असून, यावेळी जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी याचबरोबर महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सभेसाठी शिर्डी, श्रीरामपूर , कोपरगाव, संगमनेर , अकोले, पारनेर,नेवासा, अहमदनगर, राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक व युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु सभास्थळी लावण्यात आलेल्या फलकावर नेवासा उमेदवार माजी मंत्री शंकरराव गडाख आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमित भांगरे यांचा फोटो नसल्यानं संभ्रम निर्माण होतोय.
हेही वाचा :