ठाणे Bharat Jodo Nyaya Yatra : देशभरात जवळपास चार हजार किलोमीटर परिसरात 'भारत जोडो न्याय यात्रा' ही सुरू होती. आता या यात्रेचा समारोप होत असताना ठाण्यात शेवटच्या टप्प्यातील आपल्या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी ठाण्यातील तीन हात नाका भागात टीप टॉप प्लाझा येथे जेवण केले. या कार्यक्रमानंतर ही यात्रा पुन्हा सुरू झाली आणि मग राहुल गांधी यांच्या सोबत प्रियंका गांधी यांनी सहभाग घेतला.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह : लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण आला. काही वेळापूर्वीच निवडणूक आयोगाकडून देशभरातील निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. देशभरातील कार्यक्रम जाहीर करण्यात आले. पाच टप्प्यातील निवडणुकांच्या बाबत निवडणूक आयोगाने याचा खुलासा केला आणि पुन्हा एकदा लागलीच ही 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू झाली.
काँग्रेसकडून जय्यत तयारी : ठाण्यात आज (16 मार्च) राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येणार होती. त्यासाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. भिवंडीवरून ठाण्यात आल्यानंतर ठाण्यात मुंब्रा, कळवामार्गे ही यात्रा चिंतामणी चौक इथं सभा झाल्यानंतर मुलुंडमार्गे पुढं जाणार होती. त्यामुळं या सर्व मार्गावर कशा प्रकारे नियोजन करायचं यासाठी बैठका घेण्यात आल्या होत्या. यासाठी ठाण्यातील सर्व जेष्ठ नेते तयारीला लागले होते.
पक्षाचे नेते कामाला : ठाण्यात येणाऱ्या 'भारत जोडो न्याययात्रे'साठी जसे काँग्रेस नेते कामाला लागले होते. तसेच महाविकास आघाडी देखील कामाला लागली होती. या यात्रेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातून ही यात्रा काढण्यात आली. त्यामुळं काही काँग्रेस नेत्यांनी प्रदेश काँग्रेसकडे नाराजी व्यक्त केलीय. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा 2000 सालानंतर शिवसेनेकडे गेलाय. तीन वेळा महापौर पद मिळवणारा काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. त्यानंतर ठाण्यावरील काँग्रेसची पकड ढिली झाली. राहुल गांधी यांच्या यात्रेनंतर आता ठाण्यातील काँग्रेसचे दिवस चांगले येतील, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटतोय.
हेही वाचा :
- Lok Sabha Elections : देशात पहिल्यांदा ‘या’ लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय, निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा
- Lok Sabha Elections : 12 राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त-निवडणूक आयोग
- Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत 17 निर्णय; सगेसोयरे व्याख्येबाबत चार महिन्यात कार्यवाही करणार - मुख्यमंत्री