ETV Bharat / state

प्रवासी बस पुलावरुन कोसळली नदीत; सेमाडोहमध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू, शिक्षकांचा समावेश - Bus Fell In River At Semadoh - BUS FELL IN RIVER AT SEMADOH

Bus Fell In River At Semadoh : मेळघाटात खासगी प्रवासी बस नदीत कोसळून अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात तब्बल 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Bus Fell In River At Semadoh
नदीत कोसळलेली बस (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 9:50 AM IST

Updated : Sep 23, 2024, 11:46 AM IST

अमरावती Bus Fell In River At Semadoh : खासगी प्रवासी बस पुलावरुन नदीत कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मेळघाटातील सोमाडोह परिसरात धारणीजवळ घडली. या अपघातात तब्बल 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बसमधून शिक्षक आणि शाळेवरील कर्मचारी प्रवास करत असल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली आहे. या बसमधील अनेक प्रवाशांना मोठी दुखापत झाल्यानं घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

मृत आणि जखमींमध्ये शासकीय कर्मचारी अधिक : शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे धारणी, हरीसाल, सेमाडोह या ठिकाणी शासकीय सेवेत असणारे अनेक कर्मचारी शुक्रवारी अमरावतीला आले. आज आठवड्याचा पहिला दिवस असल्यानं सोमवारी सकाळी अमरावतीतूनच ही खासगी बस सुमारे 55 ते 60 प्रवाशांना घेऊन धारणीकडं निघाली. सीमाडोह जवळ खासगी बस नदीत कोसळताच अनेक प्रवासी एकमेकांच्या अंगावर दबले. सेमाडोह येथील रहिवाशांनी बसमधील प्रवाशांना वाचवण्याचा शर्थीनं प्रयत्न केला. घटनास्थळीत चार जण दगावले होते तर दोघं उपचारासाठी रुग्णवाहिकेतून परतवाड्याच्या दिशेनं निघाले असतानाच रस्त्यात दगावले. या घटनेमुळे अमरावती शहरात देखील खळबळ उडाली असून या बसमध्ये असणाऱ्या मृत आणि जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी परतवाड्याच्या दिशेनं धाव घेतली. या अपघातात पन्नास जण गंभीर जखमी झालेत.

खासगी प्रवाशी बस कोसळली नदीत : ही खासगी बस अमरावतीवरुन धारणीला निघाली होती. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस नेहमीप्रमाणं सकाळी सहा वाजता अमरावती इथून धारणीला निघाली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सेमाडोह इथल्या भूतखोरा परिसरात धोक्याच्या वळणावर असणाऱ्या नदीच्या पुलावर बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस पुलाखाली नदीत कोसळली. घटनास्थळावर प्रचंड आक्रोश सुरू झाल्यानं परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली.

घटनास्थळावर बचाव कार्य सुरू : हा अपघात घडताच सेमाडोह इथले नागरिक घटनास्थळी धावून गेले. व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. नदीत कोसळलेल्या अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या अपघाताची माहिती परतवाडा, चिखलदरा आणि धारणी पोलिसांना देण्यात आली. या तिन्ही शहरातून बचाव पथक अपघातस्थळी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळली; चार जवानांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक - BSF Bus Accident in Budgam
  2. मद्यधुंद प्रवाशानं हुज्जत घालून बेस्टचं स्टेअरिंग पकडलं; बसच्या अपघातात ८ जखमी, तरुणीचा मृत्यू - Best Bus Accidet
  3. बस अपघातात मृत पावलेल्या नुपूराचं ठरलं होतं लग्न, कुटुंबाचा आधार हरपला! - Lalbaug Bus Accident

Last Updated : Sep 23, 2024, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.