ETV Bharat / state

अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून विरोध - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan : अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. तसंच महाविकास आघाडीचा उमेदवार बिनविरोध निवडणून येणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चव्हाण यांनी केला.

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 10:56 PM IST

पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

पुणे Prithviraj Chavan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल अधिकृतपणे मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडलेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात दिली आहे. जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण दिल्लीत प्रवेश करणार होते. त्यानंतर औरंगाबादमध्ये अमित शाह यांच्या बैठकीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संघाच्या विरोधामुळं त्यांना मुंबईत प्रवेश देण्यात आल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध : "काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळं दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आमचा एकही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार नाही. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. भाजपाच्या सहा उमेदवारांपैकी चार काँग्रेसचं माजी नेते" असल्याचं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपावर टीका देखील केली आहे.

अशोक चव्हाण चौकशीमुळं भाजपामध्ये : "प्रदेशाध्यक्ष बदलण्याची काँग्रेस पक्षात चर्चा सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, अशा चर्चा जाहीर केल्या जात नाहीत. भाजपात सामील झालेल्या लोकांना काय आश्वासन दिलं होतं? कोणाला राज्यसभा, कोणाला मंत्रीपद, कोणाला उपमुख्यमंत्रीपद पदाची ऑफर देण्यात आली होती. अशोक चव्हाण यांच्यामागं चौकशी लागल्यामुळं त्यांना भाजपामध्ये जावं लागलं," अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे.

आमचा विजय निश्चित : "या सगळ्याला राज्यातील जनता कंटाळली आहे. लोक योग्य वेळी उत्तर देतील. आमचा विजय निश्चित होईल. आता भाजपावाले काँग्रेसमध्ये येणार असल्याचं सांगत आहेत. भाजपाच्या लोकांनाही चव्हाणांचा प्रवेश आवडलेला नाही. केंद्रानं जारी केलेल्या श्वेतपत्रिकेत अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळंच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमच्या महाविकास आघाडीच्या जागेला चव्हाणामुळं काही फरक पडणार नाही. आमचा उमेदवारही राज्यसभेवर बिनविरोध निवडून येईल," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

जनता योग्य वेळी उत्तर देईल : "पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री फडवणीस अशोक चव्हाण यांच्याबद्दल काय बोलले? त्यावेळेचं सर्व रेकॉर्डिंग आता समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अशोक चव्हाण याबद्दल काय बोललं त्याचे सगळे रेकॉर्डिंग आता येत आहेत. त्यामुळं जनता यांना योग्य वेळी उत्तर देईल", अशी अपेक्षा पृथ्वीराज जव्हाण यांनी व्यक्त केलीय.

हे वाचलंत का :

  1. अबुधाबीमध्ये पहिल्या BAPS हिंदू मंदिराचं मोदींनी केलं उद्घाटन
  2. सरकारनं मागण्या मान्य करूनही उपोषण का? जरांगे यांनी उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
  3. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा...! पालिकेच्या धरणांमध्ये उरलाय फक्त 49 टक्के पाणीसाठा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.