ETV Bharat / state

मुंबई अग्निशमन दलातील 6 जवानांना राष्‍ट्रपती ‘गुणवत्‍तापूर्ण सेवा पदक’ जाहीर - 75 वा प्रजासत्ताक दिन

मुंबई अग्निशमन दलातील 6 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदक जाहीर झालं आहे. 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे.

President Merit Seva Padak
President Merit Seva Padak
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 9:13 PM IST

मुंबई : मुंबई अग्निशमन दलातील सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर करण्यात आली. त्यात उपमुख्य अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, उपमुख्य अग्निशमन अधिकारी (परिमंडळ ३) हरिश्चंद्र रघु शेट्टी, विभागीय अधिकारी देवेंद्र शिवाजी पाटील, द्वितीय अधिकारी राजाराम निवृत्ती कुदळे, मुख्य अग्निशामक किशोर जयराम म्हात्रे, मुख्य अग्निशामक मुरलीधर अनाजी आंधळे यांचा समावेश आहे.

"शौर्यम् आत्मसंयमनम् त्याग: " हे ब्रीदवाक्य असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातील 6 जवानांना राष्‍ट्रपती ‘गुणवत्‍तापूर्ण सेवा पदक’ जाहीर झालं आहे. सेवा पदक प्राप्त जवानांची माहिती पुढील प्रमाणे

  • उप प्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, 30 वर्षापासून मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत ते अग्निशमन दलातील प्रस्‍ताव विभाग, कार्यशाळेचा कार्यभार सांभाळत आहेत. त्‍यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरवण्‍यात आलं आहे.
  • उपप्रमुख अग्निशमन अधिकारी हरिश्‍चंद्र रघू शेट्टी हे देखील मागील 30 वर्षापासून मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. नैसर्गिक आपत्‍तींसह मानवनिर्मित आपत्‍तीतदेखील त्‍यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सद्यस्थितीत मरोळ प्रादेशिक समादेश केंद्राचा कार्यभार सांभाळत आहेत. त्‍यांना यापूर्वी विविध संस्‍था - संघटनांकडून गौरवण्‍यात आलं आहे.
  • विभागीय अधिकारी देवेंद्र शिवाजी पाटील गेल्या 32 वर्षापासून मुंबई अग्निशमन दलात सेवा देत आहेत. सद्यस्थितीत मुंबई अग्निशमन दलातील विभागीय अग्निशमन अधिकारी (प्रशासन) या पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना महानगरपालिका आयुक्‍तांच्‍या उत्‍कृष्‍ट अग्निशामक पारितोषिकानं यापूर्वी तीनवेळा गौरवण्‍यात आलं आहे. महाराष्‍ट्र्र शासनानंदेखील त्‍यांना प्रशस्‍तीपत्रक देऊन गौरवलं आहे.
  • भायखळा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले दुय्यम अधिकारी राजाराम निवृत्‍ती कुदळे 31 वर्षापासून मुंबई अग्निशमन उत्तम कामगिरी करत आहेत. त्‍यांना विविध पारितोषिकांनी गौरवण्‍यात आलं आहे.
  • प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) किशोर जयराम म्‍हात्रे सध्‍या दादर अग्निशमन केंद्रात कार्यरत आहेत. त्‍यांनी मुंबई अग्निशमन दलात 32 वर्षे 9 महिने सेवा बजाविली आहे. त्‍यांनादेखील विविध पारितोषिकांनी गौरवण्‍यात आलं आहे.
  • विक्रोळी येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) मुरलीधर अनाजी आंधळे 27 वर्षे 9 महिन्यापासून मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीमुळं त्यांनी विविध पुरस्कार मिळाले आहेत.

हे वाचलंत का :

  1. सशस्त्र दलाच्या 80 जवानांना 'शौर्य पुरस्कार' जाहीर; राष्ट्रपतींची घोषणा
  2. अमृतकाळात देशाला नव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्राला उद्देशून विशेष संदेश
  3. महाराष्ट्रातील रामभक्ताकडून प्रभू श्रीरामांना 80 किलोची विशेष तलवार भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.