ETV Bharat / state

महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर 'वंचित'ची भूमिका ठरवू - प्रकाश आंबेडकर - Mahavikas Aghadi

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 10:21 PM IST

प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

अकोला : महाविकास आघाडीच्या निमंत्रणानंतर आम्ही बैठकीला गेलो होतो. या बैठकीत नेमके मुद्दे मांडण्याचा वंचित बहुजन आघाडीनं प्रयत्न केला आहे. या बैठकीत सुरुवातीला ओबीसी संवर्गातील आरक्षणात कोणीही वाटेकरी होऊ नये, यावर आम्ही चर्चा केली. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना संदर्भात चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या बैठकीत तिन्ही पक्षांनी जागेच्या वाटपाबाबत माहिती द्यावी, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी निर्णय घेईल, असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

बैठकीत आमच्याकडून 25 मुद्दे : पुढं बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत काहीही ठरलं नसल्याचं दिसून येत आहे. त्यांनी काहीतरी ठरवावं म्हणून काही मुद्दे आमच्याकडून मांडलं गेले. या बैठकीत आमच्याकडून 25 मुद्दे देण्यात आले आहेत. आम्ही प्रत्येक पक्षाला त्या मुद्द्यावर त्यांची भूमिका मांडण्याचं आवाहन केलं आहे. या मुद्यावर त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे. याबाबत आम्ही त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय.

जागा वाटपाबाबत माहिती द्या : दिल्लीत वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीन कायदे रद्द केले. त्यानंतरची महाविकास आघाडीची भूमिका काय आहे. या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा केली आहे. यासोबतच गेल्या अडीच वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट एकत्र होते. त्यांनी अडीच वर्षांमध्ये निवडणुकीतील जागा वाटपाबाबत काय भूमिका घेतली आहे. त्याबाबत आम्हाला दोन फेब्रुवारी पर्यंतच्या बैठकीपूर्वी माहिती द्यावी. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर दोन तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही त्यासंदर्भात भूमिका घेऊ. केंद्रामध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही, असा विषय देखील आम्ही मांडला आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का :

  1. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री
  2. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तोपर्यंत सरकार निवडणूक घेणार नाही; जरांगे पाटील यांचं वक्तव्य
  3. रेशनकार्ड धारकांना मोफत साडी देणं म्हणजे निवडणुकीचा स्टंट; विरोधकांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.