ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी? महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर - Devendra Fadnavis - DEVENDRA FADNAVIS

BJP National President : महाराष्ट्रातील भाजपाचे जेष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा सुरू असून जवळपास त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब भेट घेतल्यानंतर या चर्चेनं चांगला जोर धरलाय.

possibility about dcm Devendra Fadnavis will be appointed BJP national president
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 4:05 PM IST

Updated : Aug 1, 2024, 5:34 PM IST

मुंबई BJP National President : राज्यातील भारतीय जनता पक्षातील मुख्य चेहरा म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडं भाजपा अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 2014 ते 2019 अशी सलग पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राजकारणातील कारकीर्द 2019 पासून सतत वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ''एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन.'' असा एकेरी उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांना थेट धमकी दिली. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील 'संभाव्य एक्झिट' महाराष्ट्राच्या राजकारणावर बराच काही परिणाम करणारी असेल.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (ETV Bharat Reporter)

राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीसच का? : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर आता त्यांच्या जागी कोण? अशी चर्चा सुरू होती. यासाठी जागेसाठी अनेक नावं चर्चेत आली. परंतु त्यापैकी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून याची लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. फडणवीस यांची एकंदरीत आतापर्यंतची राजकीय कारकीर्द, त्यांच्यात असलेली गुणवत्ता, त्यांची कार्यक्षमता आणि अभ्यासू वृत्ती पाहता तेच या पदासाठी योग्य असल्याचं बोललं जातंय. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध राहिलेत. तसंच फडणवीस हे राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळं फडणवीसांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्यास काही हरकत नाही. तसं घडल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे पद भूषवणारे देवेंद्र फडवणीस हे महाराष्ट्रातील दुसरी व्यक्ती असतील.

देवेंद्र फडणवीस मविआच्या टार्गेटवर : 2019 साली भाजपाचे 105 आमदार निवडून आलेले असताना तसंच शिवसेनेसह युतीत स्पष्ट बहुमत असताना देखील उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा केल्यानं राज्यात भाजपाला सरकार स्थापन करता आलं नाही. परंतु, ही कमतरता अडीच वर्षातच देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष बुद्धीमुळे भरून निघाली. राज्यात फोडाफोडीचं राजकारण करत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या साथीनं राज्यात सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या या राजकारणामुळं महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली आणि तेव्हापासून फडणवीस हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मुख्य टार्गेटवर राहिले. विशेष करुन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं राहिलेत. असं असतानाच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलावून भाजपाविरोधी महाराष्ट्रातील वातावरणाची धग कमी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा निवडणुका होईपर्यंत राज्यातच रहावं, अशी राज्यातील भाजपाच्या नेत्यांची इच्छा आहे. याबाबत कोणीही उघडपणे बोलत नसलं तरी सुद्धा नाव न छापण्याच्या अटीवर भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं की, "कदाचित देवेंद्र फडणवीसांना सध्याच्या घडीला पक्षाचं कार्यकारी अध्यक्ष केलं जाऊ शकतं. तसंच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं जाऊ शकतं." अर्थात असं घडणं हा उत्तम सुवर्णमध्य ठरु शकतो.

फडणवीसांकडं अनेक कलागुणांचा आविष्कार : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुणवत्ता, चिकाटी, अभ्यासू वृत्ती त्याचबरोबर संघटना बांधणीचं कौशल्य आणि राजकीय संकटातून मुत्सद्दीपणे व्यवस्थित मार्ग काढण्याची क्षमता आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीसांना अर्थकारण आणि त्याच्याशी निगडित सखोल बाबींचा अभ्यास आहे. भाजपाच्या इतर नेत्यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही जमेची बाजू असल्याकारणानं याचा पुरेपूर उपयोग भाजपा पक्षश्रेष्ठी करुन घेण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीतील राजकारण आणि निवडणुका संपल्यानंतर होणारं राजकारण, अर्थव्यवस्थेची परिस्थिती, त्यासोबत प्रशासकीय मर्यादा याबाबत जे निर्णय घ्यावे लागतात ती क्षमता फार मोजक्या नेत्यांमध्ये असते. ती क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. राष्ट्रीय स्तरावरील भाजपा समोरील आव्हानं परतवून लावण्यासाठी देवेंद्र फडवणीस यांच्या या कलागुणांचा उपयोग भाजपाला होणार आहे. सोबतच राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे सर्वात महत्त्वाचे प्रमुख पद फडणवीस यांच्याकडं आल्याने साहजिकच त्यांचे राजकीय वजन मोठ्या प्रमाणात वाढणार असून देशासहित महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्यांना त्याचा फायदाच होणार असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा -

  1. देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष ? काय आहेत निवडीमागची समीकरणं, काय म्हणाले भाजपातील नेते ? - Devendra Fadnavis
  2. XXX टोळ्या घेऊन आमच्याशी लढणार का, संजय राऊतांचा हल्लाबोल; कवचकुंडलं काढून मैदानात या, सरकारला आव्हान - Sanjay Raut Slams Devendra Fadnavis
  3. देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे पूर्ण गुण: ही तर आमच्यासाठी आनंदाची बाब, 'या' मंत्र्यांनी व्यक्त केलं मत - Chandrakant Patil Statement

Last Updated : Aug 1, 2024, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.